IPL 2026 – ड्रेसिंग रूममध्ये बसून वेपिंग करणं रियान परागला भोवलं! BCCI ने केली कारवाई
IPL 2026 मधील पंजाब किंग्जविरुद्धच्या 40 व्या सामन्यादरम्यान राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला. या सामन्याच्या दुसऱ्या डावात रियान पराग ड्रेसिंग रूममध्ये ई-सिगरेट म्हणजेच ‘वेप’चा वापर करताना कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली होती, तसेच रियानवर कायदेशीर कारवाई होऊन त्याला तुरुंगवास भोगावा लागू शकतो, असे तर्कवितर्कही लढवले जात होते.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रियान परागवर अधिकृत कारवाईची घोषणा केली आहे. आयपीएलच्या आचारसंहितेतील कलम 2.21 चे उल्लंघन केल्याप्रकरणी रियानवर ही कारवाई करण्यात आली आहे. हे कलम खेळाची प्रतिमा मलीन करणाऱ्या वर्तणुकीशी संबंधित आहे. या गुन्ह्यासाठी सामनाधिकारी अमित शर्मा यांनी रियानच्या मॅच फीमध्ये 25 टक्क्यांची कपात केली असून त्याच्या नावावर एक ‘डिमेरिट पॉईंट’ देखील नोंदवण्यात आला आहे. रियानने आपली चूक मान्य करत ही शिक्षा स्वीकारली आहे.
वैभवची फलंदाजी म्हणजे सिनेमा पाहिल्याचा आनंद, वैभवच्या झंझावातावर पुजाराही फिदा
केवळ खेळाडूवर दंड आकारून बीसीसीआय थांबलेली नाही, तर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन बोर्ड आता कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. आयपीएलची प्रतिष्ठा जपण्यासाठी दोषी संघ, त्यांचे अधिकारी आणि संबंधित खेळाडूंवर अधिक कडक कारवाई करण्याचे संकेत बीसीसीआयने आपल्या निवेदनात दिले आहेत. या घटनेमुळे क्रिकेट वर्तुळातून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, भविष्यात अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी बोर्ड काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
🚨 बातम्या 🚨@rajasthanroyals कर्णधार रियान परागला त्याच्या मॅच फीच्या 25% दंड ठोठावण्यात आला आहे आणि खेळाडू आणि संघ अधिका-यांसाठी आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम 2.21 चे उल्लंघन केल्याबद्दल एक डिमेरिट पॉइंट (लेव्हल 1) देखील जमा केला आहे.
अधिक तपशील 🔽 | #TATAIPL https://t.co/zftWRg2QWH
— इंडियन प्रीमियर लीग (@IPL) 30 एप्रिल 2026
Comments are closed.