IPL 2026 – वैभव झाला विराटचा फॅन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

प्रत्येक फलंदाजाला आयपीएलमधील ‘ऑरेंज कॅप’ खुणावत असते. पण वैभव सूर्यवंशीला मात्र ‘ऑरेंज कॅप’पेक्षा एक गोष्ट खास वाटत आहे. वैभवने तुफानी फटकेबाजी करत लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यानंतर ‘ऑरेंज कॅप’ जिंकली पण खरी, पण त्याला खरी आवडती कॅप ही विराट कोहलीच्या स्वाक्षरीची होती.

या हंगामातील 10 एप्रिलला राजस्थान रॉयल्सचा सामना गुवाहाटीमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी झाला होता. त्या सामन्यात वैभवने अवघ्या 15 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले आणि 26 चेंडूंमध्ये 78 धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. त्या ऐतिहासिक लढतीनंतर वैभव सूर्यवंशीला त्याच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान क्रिकेट भेट मिळाली. महान फलंदाज विराट कोहलीने या सामन्यानंतर तरुण वैभवशी बराच वेळ संवाद साधला आणि त्याच्या एका कॅपवर स्वाक्षरी करत लिहिले, ‘प्रिय वैभव, खूप छान खेळलास.’ विराटने दिलेली ही स्वाक्षरी केलेली कॅप वैभवची सर्वात आवडती वस्तू बनली आहे. सामन्यांदरम्यान तो अनेकदा राजस्थान रॉयल्सच्या डगआऊटमध्ये ती कॅप घातलेला दिसतो. मंगळवारी रात्री जयपूरमध्येही असेच घडले. सामन्यानंतर कॅमेरामननी वैभवचा पाठलाग केला असता तो मैदानावर आपल्या सहकाऱ्यांशी आणि लखनौचे मालक संजीव गोएंका यांच्याशी गप्पा मारताना तीच स्वाक्षरी केलेली कॅप घातलेला दिसला. तो ही खास कॅप डोक्यावरून काढायला तयार नव्हता. जेव्हा तो ‘सामनावीर’ पुरस्कार स्वीकारायला आला तेव्हा त्याला ती कॅप ‘ऑरेंज कॅप’सोबत बदलावी लागली. जड अंतःकरणाने वैभवला विराट कोहलीची विशेष कॅप काढून ती घालावी लागली.

Comments are closed.