MI vs CSK : 103 धावांनी ‘चेन्नई एक्सप्रेस’ समोर मुंबई इंडियन्सचा पराभव
आयपीएलच्या ३३ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं मुंबई इंडियन्सला १०३ धावांनी पराभूत केलं आहे. संजू सॅमसन याचं नाबाद शतक आणि अकील हुसैन याच्या चार विकेटमुळं चेन्नईनं विजय मिळवत गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली.चेन्नई सुपर किंग्जचा धावांच्या संदर्भात मुंबईवरील मोठा विजय ठरला. अकील हुसैन यानं चार विकेट घेतल्या त्यासाठी त्यानं 17 धावा दिल्या. हुसैन यानं एक ओव्हर निर्धाव टाकली.चेन्नई सुपर किंग्जनं प्रथम फलंदाजी करताना 207 धावा केल्या होत्या. यामध्ये संजू सॅमसनच्या नाबाद 101 धावांचा समावेश होता. संजू सॅमसन यानं आयपीएल करिअरमधील पाचवं शतक केलं. मुंबई विरुद्ध चेन्नईचे दुसरे खेळाडू मात्र अपयशी ठरले.मुंबई इंडियन्सच्या डावाच्या सुरुवातीलाच चेन्नई सुपर किंग्जनं धक्के दिले. मुंबईनं 11 धावांवर तीन विकेट गमावल्या. क्विंटन डी कॉकनं गेल्या मॅचमध्ये शतक केलं होतं. या मॅचमध्ये तो शुन्यावर बाद धाला. क्विंटन डी कॉक आणि हार्दिक पांड्यांच्यासह मुंबईचे आठ खेळाडू 10 धावांचा टप्पा पार करु शकले नाहीत.
Comments are closed.