सोबत काम करणाऱ्या सहकारी तरुणीला आक्षेपार्ह मेसेज पाठवून नको ती मागणी, नाशिक पाठोपाठ मुंबईतही..
Agripada Crime : तरुणीकडून तिच्या फोटोंची मागणी; अश्रफ नावाच्या तरुण विरोधात गुन्हा दाखल
मिळलेल्या माहितीनुसार, यात बळी तरुणीकडून तिच्या फोटोंची मागणी करण्यात आली आहे. यातील तरुणीशी ‘लव्ह फ्रेंडशिप’ करून लॉजवर जाऊन शारीरिक संबंध करण्याची आरोपीने फोनवर इच्छा व्यक्त केल्याची माहिती आहे. तरुणीच्या मैत्रिणींसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोपीने दावा केल्याचा एफआयआरमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. तसेच तक्रारदार तरुणी हिंदू असल्याच तिच्या मैत्रिणी सांगताच ‘आज कल हिंदू लडकी को मुस्लिम पसंद है’ असा आरोपीने दावा केल्याचा देखील एफआयआरमध्ये उल्लेख आहे.
Crime : कंपनीच्या व्हाट्सअप ग्रुपमधून मोबाईल नंबर मिळवला, पण प्रसंगावधानपणामुळे आरोपीचे पितळ उघडं पडलं
दरम्यान, या प्रकरणी अश्रफ नावाच्या तरुणाविरोधात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचार, पाठलाग करणे तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणी फेब्रुवारी महिन्यात बांधकाम क्षेत्रातील एका कंपनीत महालक्ष्मी येथे टेलीकॉलर म्हणून काम करत होती. यात कंपनीच्या व्हाट्सअप ग्रुपमधून संशयित आरोपीने तरुणीचा मोबाईल नंबर मिळवला. त्यांनतर कॉल कराकरून संपर्क साधला. यावेळी बळी तरुणीने शेजाऱ्याच्याचा मोबाईल घेऊन व्हाट्सअप कॉल रेकॉर्ड केले. परिणामी तरुणीच्या प्रसंगावधानपणामुळे आरोपीचे पितळ उघडं पडलंहे. यावेळी इतर मुलींचे फोटो पाठवून त्यांच्याशी देखील शारीरिक संबंध केल्याचा आरोपीने फोनवर दावा केल्याचा एफआयआरमध्ये उल्लेख आहे. परिणामी पोलिसांनी केलेल्या तपासात इतरही तरुणींना अशाच प्रकारचे कॉल केल्याच तपासात उघड झालं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.