इस्रोचा सायंटिस्ट असल्याचे सांगून महिलेला 26 लाखांचा गंडा
मेट्रोमोनियल वेबसाईटवर इस्रोचा सायंटिस्ट असल्याची खोटी ओळख सांगून महिलेला लग्नाचे आमिष दाखवणाऱ्या आणि महिलेची 26 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तोतयाच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आदर्श प्रशांत म्हात्रे (वय 34) ऊर्फ स्वप्नील वारूळे ऊर्फ हेमंत गायकर ऊर्फ जयेश पाटील असे त्याचे नाव आहे. तो अलिबाग येथे राहणारा आहे.
आदर्श म्हात्रेने महिलेशी मेट्रोमोनियल साईटवर ओळख वाढवून स्वतःला उच्चपदस्थ आणि प्रतिष्ठत असल्याचे भासवले. लग्नासाठी मागणी घालताना त्याने महिलेला भावनिक जाळ्यात ओढले. एवढय़ावरच न थांबता, फिर्यादीच्या मुलीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्याने महिलेकडून ऑनलाईन व्यवहारांच्या माध्यमातून मोठी रक्कम उकळली.
Comments are closed.