भांडुपमध्ये इमारतीच्या स्लॅबचा ढाचा कोसळला, लग्नाला आलेले वऱ्हाडी खड्ड्यात पडले, दुर्दैवी
Bhandup Accident : लग्नाला आलेले वऱ्हाडी खड्ड्यात पडले; एकाचा मृत्यू, १० जखमी
दरम्यान, हे सर्व 11 तरुण जवळच सुरू असलेल्या एका लग्नाच्या मंडपातून या ठिकाणी आले होते, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, ते नेमके कशासाठी या बांधकामस्थळी गेले होते, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असून पोलिसांकडून याबाबत चौकशी सुरू आहे. घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून सध्या पाहणी आणि बचावकार्य सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. फक्त या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून बांधकामातील सुरक्षेच्या नियमांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.