रिक्षा-टॅक्सी चालकांनो लक्ष द्या! कायद्यात बदल करण्याच्या हालचाली; परवाना मिळवण्यासाठी अन् नूतन

मुंबई : येत्या एक मे रोजी ‘महाराष्ट्र दिना’चे औचित्य साधत या दिवशी राज्यभरात रिक्षा व टॅक्सी चालकांच्या परवान्यांची (rickshaw-taxi drivers) तपासणीसोबतच चालकांना मराठी भाषेचे व्यवहारज्ञान आहे का, याची पडताळणीची मोहीम परिवहन विभागामार्फत हाती घेतली जाणार आहे. या मोहिमेतून अमराठी चालकांच्या मनात निर्माण झालेली अनावश्यक भीती दूर करून त्यांना कामासाठी आवश्यक असेल इतकी मराठी भाषा शिकवली जाणार असल्याची माहिती आहे. (rickshaw-taxi drivers)

त्याचबरोबर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. रिक्षा टॅक्सी चालकांना (rickshaw-taxi drivers) मराठी भाषा आलीच पाहिजे यासाठी कायद्यात बदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वाहनचालकांसाठी मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान (‘वर्किंग नॉलेज’) अनिवार्य करण्यासाठी गृह विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती आहे. वाहनचालकांसाठी नियम ४, ७८ व ८५ मध्ये मोठे बदल प्रस्तावित असल्याचीही माहिती आहे. राज्याच्या परिवहन आयुक्तांनी यासंदर्भातील प्रस्ताव गृह विभागाकडे सादर केला असून, त्यानुसार मसुदा अधिसूचना काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.(rickshaw-taxi drivers)

Rickshaw-taxi drivers : नवीन तरतुदीनुसार काय बदल आहेत

– सार्वजनिक सेवा वाहन चालविण्याची परवानगी (Authorization) देताना मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान तपासले जाणार आहे.
– मीटर असलेल्या मोटार कॅब वाहनांसाठी परवान्यांच्या अतिरिक्त अटींमध्ये मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात येणार आहे.
– विशेषतः ऑटो रिक्षा व टॅक्सी (मोटार कॅब) चालकांच्या परवाना नूतनीकरणाच्या वेळी मराठीचे ज्ञान दाखवणे बंधनकारक असेल.
– यामुळे राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधणे अधिक सुलभ होणार आहे.

Rickshaw-taxi drivers :  हरकती व सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू

या मसुदा नियमांवर नागरिक, संघटना तसेच संबंधित घटकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत प्राप्त होणाऱ्या सर्व सूचनांचा शासनाकडून विचार करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील रिक्षा, टॅक्सी तसेच ओला, उबर आणि ई-बाईक टॅक्सी सेवांमधील अमराठी व्यावसायिक वाहनचालकांनी प्रवाशांशी मराठीतून संवाद साधणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ, साहित्यिक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची विशेष बैठक आयोजित केली होती. या बैठकीत प्रामुख्याने अमराठी चालकांच्या मनात निर्माण झालेली अनावश्यक भीती दूर करून व्यावहारिक मराठी भाषा त्यांनी शिकावी यासाठी त्यांना प्रोत्साहन
देण्यावर भर दिला जाण्यावर चर्चा झाली.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.