होर्मुझ सामुद्रधुनीत इराणकडून टोलवसुली सुरू, जहाजांसाठी नवी नियमावली जारी
होर्मुझ सामुद्रधुनीतून ये-जा करणाऱया जहाजांवर टोल आकारण्यासाठी इराणने आधीपासूनच हालचाली सुरू केल्या होत्या, परंतु आता इराणने टोल आकारण्यास सुरुवात केल्याचे एका जहाज वाहतूक नियतकालिकाने म्हटले आहे. पर्शियन गल्फ सामुद्रधुनी प्राधिकरणाने याबाबत एक नियमावली जाहीर केली असून याद्वारे होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करण्यासाठी जहाजांना परवाना घ्यावा लागणार आहे. शिवाय यासाठी आवश्यक शुल्कदेखील भरावे लागेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
होर्मुझमधून प्रवास करणाऱया जहाजांना सर्व माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. जहाज मालकाचे नाव, विमा कंपनी, जहाजावरील सदस्यांची माहिती आणि प्रवासासाठी निश्चित मार्ग याची माहिती प्राधिकरणाला द्यावी लागणार आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱया आणि येणाऱ्या जहाजांसाठी 40 प्रश्नांचा समावेश असलेला अर्ज तयार करण्यात आला आहे. यात विविध प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. जहाजाचे नाव, सदस्यांची नावे, ओळख, पूर्वीची ओळख, देश, निश्चित स्थान, राष्ट्रीयत्व आदींचा यात समावेश करण्यात आला आहे. या अर्जात देण्यात येणारी माहिती सत्य आणि संपूर्ण स्वरूपात देण्यात यावी, चुकीची माहिती आढळल्यास कारवाई केली जाईल, असेही प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
Comments are closed.