क्रिकेटविश्वात मोठा ट्विस्ट! राहुल द्रविड बनला नव्या टीमचा मालक, T20 लीगमध्ये जगभरातील स्टार खे

राहुल द्रविडने ETPL T20 लीगमध्ये संघ खरेदी केला: युरोपमध्ये क्रिकेटचा नवा अध्याय सुरू होणार असून भारतीय क्रिकेटमधील महान फलंदाज राहुल द्रविड आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहेत. टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि ‘द वॉल’ म्हणून ओळखला जाणारा द्रविड यांची युरोपियन टी20 प्रीमियर लीग (ETPL) मधील डब्लिन गार्डियन्स फ्रँचायझीच्या मालकपदी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

ETPL मध्ये 6 संघांची एन्ट्री

11 मे रोजी ईटीपीएलने अधिकृतपणे राहुल द्रविड यांच्या नावाची घोषणा केली. 2026 पासून सुरू होणाऱ्या या नव्या लीगमधील सर्व 6 फ्रँचायझींची रचना आता पूर्ण झाली आहे. डब्लिन येथे आयोजित भव्य कार्यक्रमात द्रविड यांना डब्लिन फ्रँचायझीचे मालक म्हणून सादर करण्यात आले. या सोहळ्यात क्रिकेट आणि मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज उपस्थित होते. ईटीपीएलचे सह-संस्थापक अभिषेक बच्चन यांच्यासह ख्रिस गेल, जॉन्टी रोड्स, ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डू प्लेसिस यांसारखे स्टार्सही या लीगशी जोडले गेले आहेत.

या नव्या भूमिकेबाबत बोलताना राहुल द्रविड म्हणाले की, ईटीपीएल मागील मोठी दृष्टी आणि युरोपमध्ये क्रिकेटला नवी ओळख देण्याचा प्रयत्न यामुळे ते या प्रकल्पाकडे आकर्षित झाले. त्यांच्या मते, ही लीग युवा खेळाडूंना मोठं व्यासपीठ देईल. डब्लिनमध्ये क्रिकेटबाबत प्रचंड उत्साह असून भविष्यात इथे मोठ्या प्रमाणावर विकासाची संधी आहे, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, अभिषेक बच्चन यांनी राहुल द्रविडसारखा महान खेळाडू लीगशी जोडला जाणं हे ईटीपीएलसाठी अभिमानाची बाब असल्याचं सांगितलं. युरोपमध्ये क्रिकेटचा विस्तार करण्याच्या दिशेने हे मोठं पाऊल असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

जगभरातील स्टार खेळाडूंचा जलवा

ईटीपीएल ही लीग क्रिकेट आयर्लंड, क्रिकेट स्कॉटलंड आणि रॉयल डच क्रिकेट असोसिएशन यांच्या सहकार्याने सुरू होत आहे. युरोपमधील पहिल्या आयसीसी-मान्यताप्राप्त मल्टी-कंट्री फ्रँचायझी टी20 लीगमध्ये डब्लिन, बेलफास्ट, एडिनबर्ग, ग्लासगो, रॉटरडॅम आणि ॲमस्टरडॅम या शहरांच्या संघांचा सहभाग असणार आहे. या लीगमध्ये मिचेल मार्श, टिम डेव्हिड, मिचेल सँटनर, लियाम लिव्हिंगस्टोन, ग्लेन मॅक्सवेल, हेनरिक क्लासेन आणि फॅफ डु प्लेसिस यांसारखे जागतिक क्रिकेटमधील अनेक मोठे स्टार्स खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

सर्व सहा ईटीपीएल फ्रँचायझी आणि त्यांचे मालक

डब्लिन फ्रँचायझी – राहुल द्रविड
बेलफास्ट फ्रँचायझी – ग्लेन मॅक्सवेल आणि रोहन
एडिनबर्ग फ्रँचायझी – काईल मिल्स, नॅथन मॅककुलम आणि रॅशेल वाईजमन
ग्लासगो फ्रँचायझी – विपुल अग्रवाल आणि ख्रिस गेल
ॲमस्टरडॅम फ्रँचायझी – स्टीव्ह वॉ, जेमी ड्वायर आणि टिम थॉमस
रॉटरडॅम फ्रँचायझी – जॉन्टी ऱ्होड्स, फॅफ डू प्लेसिस, ग्लाशीन आणि समीर शाह, व्यवस्थापकीय भागीदार म्हणून मधुकर श्री

हे ही वाचा –

PBKS vs DC IPL 2026 : लाजिरवाणी फिल्डिंग अन्…. पंजाब किंग्सचा पुन्हा बट्ट्याबोळ; श्रेयस अय्यरने थेट या खेळाडूंनाच धरलं पराभवासाठी जबाबदार

आणखी वाचा

Comments are closed.