इराणने उघडली हवाई हद्द; 6 विमानतळ पुन्हा सुरू, आखातात अडकलेल्या नागरिकांचा मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
इराण, अमेरिका-इस्रायल युद्धामुळे आखातामध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. इराणने पूर्व भागातील हवाई क्षेत्राचा काही भाग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. इराणच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने शनिवारी या निर्णयाची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर इरामधील 6 विमानतळांवरील कामकाज पुन्हा सुरू झाले आहे. असे असले तरी विमान कंपन्या अद्याप खबरदारी म्हणून या मार्गाचा वापर करणे टाळत असल्याचे ‘फ्लाइट ट्रॅकर’ संकेतस्थळांनी नमूद केले आहे.
‘असोसिएशन ऑफ इराणी एअरलाईन्स’ने दिलेल्या माहितीनुसार, तेहरानमधील इमाम खामेनी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ यासह मशहाद, बिरजंद, गोरगन आणि झाहेदान येथील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर विमान सेवा पुन्हा सुरू झाली आहे. ‘तस्नीम’ वृत्तसंस्थेने यासंदर्भात माहिती दिल्याचे वृत्त ‘मनी कंट्रोल‘ने दिले आहे.
बातमी अपडेट होत आहे…
Comments are closed.