पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! सरफराज अहमद आता संघाचा नवा कोच, बांगलादेशविरुद्ध मालिकेसा
पाकिस्तान संघ विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिका जाहीर : पाकिस्तानची क्रिकेट टीम पुढील महिन्यात म्हणजे दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेसाठी पाकिस्तानच्या समितीने 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, या संघात चार अनकॅप्ड खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या मालिकेत संघाची धुरा शान मसूद सांभाळणार आहे.
दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेत सरफराज अहमद यांची कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या सोबत असद शफीक यांना फलंदाजी प्रशिक्षक, तर उमर गुल यांना गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
शान मसूदच्या नेतृत्वाखाली नवी दिशा
या दोन सामन्यांच्या मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या 16 सदस्यीय संघाचे नेतृत्व शान मसूद करणार आहेत. ही मालिका सध्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलचा भाग असून, पाकिस्तान सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे संघ या मालिकेत दमदार कामगिरी करून आपली स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करेल. संघात बाबर आझम, शाहीन अफरीदी आणि मोहम्मद रिझवान यांसारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे संघ अधिक बळकट दिसत आहे.
युवा खेळाडूंना सुवर्णसंधी
या मालिकेसाठी निवडकर्त्यांनी तरुण खेळाडूंवर विशेष भर दिला आहे. अब्दुल्ला फजल, अमाद बट, अजान अवैस आणि गाजी घोरी या चार खेळाडूंना पहिल्यांदाच टेस्ट संघात स्थान देण्यात आले आहे. या सर्वांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी केल्यामुळे त्यांची निवड झाली आहे. विशेषतः डावखुरा फलंदाज फजल आणि अवैस यांनी चांगली छाप पाडली आहे, तर अमाद बट हा अष्टपैलू खेळाडू म्हणून संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
पाकिस्तान आणि बांगलादेश मालिकेचे वेळापत्रक (Pakistan vs Bangladesh Series Schedule)
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना 8 ते 12 मे दरम्यान शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळला जाईल. दुसरा कसोटी सामना 16 ते 20 मे दरम्यान सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होईल. मालिकेपूर्वी, पाकिस्तानचे खेळाडू आपली तयारी अधिक मजबूत करण्यासाठी 27 एप्रिल ते 1 मे दरम्यान कराची येथे लाल चेंडूच्या सराव शिबिरात सहभागी होतील.
पाकिस्तान संघ विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिका जाहीर
शान मसूद (कर्णधार), अब्दुल्ला फजल, अमद बट, अझान अवैस, बाबर आझम, हसन अली, इमाम- उल-हक, खुर्रम शहजाद, मोहम्मद अब्बास, मोहम्मद रिझवान, गाझी घोरी, नोमान अली, साजिद खान, सलमान अली आगा, सौद शकील आणि शाहीन शाह आफ्रिदी.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.