लव्ह मॅरेज झालंय का काय?, महिला उमेदवाराला अजित पवारांचा थेट प्रश्न, मंचरच्या सभेत काय घडलं?
पुणे: पुण्याच्या मंचरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (NCP Ajit Pawar) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे (मराठी) एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहेत. मंचर नगरपंचायत काबीज करण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाली आहे, त्यांचा सामना हा शिंदेंच्या शिवसेनेशी आहे. आज अजित पवाराच्या राष्ट्रवादीची आणि भाजपची सभा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे वारंवार चर्चेत येणारे अजित पवार आज पुन्हा आपल्या एका प्रश्नामुळे पुन्हा चर्चेचा विषय ठरलेत. अजित पवारांनी थेट महिला उमेदवाराला मंचावर लव्ह मॅरेज झालंय का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. अजित पवारांनी मंचर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोनिका बाणखेले यांना लव्ह मॅरेज झालंय का? असा प्रश्न विचारला. सासर आणि माहेर एकाच गावात आहे, म्हणून हा प्रश्न विचारल्याचं स्पष्टीकरणही अजितदादांनी दिलं आहे.
Ajit Pawar: लव्ह मॅरेज झालंय का काय? काय म्हणाले अजित पवार?
मंचर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोनिका बाणखेले पुर्वीच्या मोनिका बेंड, हा तुमचा उमेदवार फार फायदेशीर आहे, मोनिकाताईंचं माहेर पण इथेच आहे आणि सासरपण इथेच आहे, बरोबर आहे ना? मग लव्ह मॅरेज आहे का काय? यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला, यावेळी पुढे अजित पवार म्हणाले, सासर माहेर जवळ असलं की जरा शंकेला जागा उरते, पण हरकत नाही, वाईट वाटून घ्यायचं कारण नाही, असंही अजित पवारांनी पुढे म्हटलं आहे.
मंचरनगर पंचायतीच्या निवडणूक प्रचारासाठी #अजितपावा यांनी सभेत बोलताना #राष्ट्रवादी #भाजप युतीच्या #नगराध्यक्ष पदाच्या #उमेदवार मोनिका बाणखेले-बेंड यांची ओळख करून देताना त्यांचे माहेरही मंचर असल्याचे व सासरही मंचर असल्याचे सांगताना. लव्ह मॅरेज आहे का? प्रश्न विचारताच सभेत हशा पिकला pic.twitter.com/SxoQYfuqR9
— अंकिता शांतीनाथ खाणे (@KhaneAnkita) 28 नोव्हेंबर 2025
अजित पवार : अजित पवारांचा भाजपच्या जिल्हाध्यक्षांना चिमटा; पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे…
मंचरच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांना हसतमुखाने चिमटा काढला. माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांनी त्यांचं भाषण संपताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतील असं म्हणाले. वेळ अजित पवारांच्या भाषणाची होती, पण अजित दादांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षांना बोलायला संधी द्यायला सांगितलं. पण त्यांची ओळख पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे अन आत्ता भाजपचे जिल्हाध्यक्ष अशी ओळख करुन द्यायला लावली, मग दिलीप वळसेंनी सुरातसुर मिळवत तशी ओळख करुन दिली.
अजित पवार : आता परत बातमी व्हायची अजितदादांनी प्रलोभन दाखवलं
मंचरच्या पाण्यासाठी 135 कोटींचा निधी मंजूर करायला किती वेळ लागेल, असं अजित पवार म्हणाले. तितक्यात मागून एक चिठ्ठी आली, त्यात 135 नव्हे तर 136 कोटी असा उल्लेख होता. अरे बोललो की मी हे, अच्छा मी 1 कोटी कमी बोललो व्हय. अरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं की 136 तर 136 कोटी निधी मंजूर करायला किती वेळ लागेल तेव्हा. आता बातमी होईल की मी प्रलोभन दाखवलं असंही अजित पवारांनी मिश्कीलपणे म्हटलं आहे.
अजित पवार : अजित पवारांकडून नामोल्लेख टाळत एकनाथ शिंदेंवर निशाणा
आपल्या भाषणावेळी अजित पवारांनी एकनाथ शिंदेंचं नाव घेणं टाळत अप्रत्यक्षपणे त्यांच्यावरती निशाणा साधला आहे. मंचरचा विकास कोण करु शकतं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजी आढळराव, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद करु शकतात, असं म्हणताना महायुती सरकारमधील दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उल्लेख मात्र टाळला. मंचरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेसोबत सामना असल्यानं अजित पवारांनी नामोल्लेख टाळत एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.
अजित पवार : गुजरातला फक्त 50 बिबटे पाठवू शकतो, मग उरलेल्या 1200 बिबट्याचं काय करणार?
जुन्नर, खेड, मंचर भागात मोठ्या प्रमाणावर बिबट्या आढळून येत आहेत, बिबट्यांनी हल्ले केल्याच्या घटना समोर येत आहेत, या सर्व बाबींवर बोलताना अजित पवार म्हणाले, आता बिबट्या कुठं पण यायला लागलाय. मध्यंतरी बारामतीत पण आला होता. बिबट्यांचा बंदोबस्त लावण्यासाठी सरकार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमी, वनमंत्री आम्ही सगळ्यांनी मिळून एक बैठक घेतली. पण निर्णय घेण्यात बऱ्याच अडचणी येत आहेत. आता एकदा का बिबट्याच्या तोंडाला मानवाचं रक्त लागलं की ते धोकादायक ठरतं. हे पाहता गोळ्या घालून ठार करण्याची ही परवानगी घेतली. मग आपण बिबटे गुजरातला पाठवायचं ठरलं, पण 50 च्या पुढं आम्हाला देऊ नका, असं वनतारा मधून सांगण्यात आलं. आता 1200 बिबट्या झालेत, म्हणून नसबंदीचा निर्णय घेतला, पण नसबंदी करुन काय होणार? तो हल्ला तर करणार ना? असा ही प्रश्न विचारला जातोय. पण आपण टप्याटप्याने बिबट्याचा प्रश्न मार्गी लावणार आहोत, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.