पंजाबमध्ये आयएसआयचा डाव हाणून पाडला
86 हँडग्रेनेड हस्तगत : दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा पर्दाफाश
वृत्तसंस्था, जालंधर
पंजाब पोलिसांनी सीमेपलिकडून संचालित दहशतवादी नेटवर्कच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. काउंटर इंटेलिजेन्स जालंधरने भारतात दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट रचत असलेल्या दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड केला आहे. याचबरोबर एका दहशतवाद्याला 86 हँडग्रेनेडसह अटक करण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनापूर्वी पंजाब पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. काउंटर इंटेलिजेन्सने पोलिसांसोबतच्या संयुक्त अभियानात आयएसआयकडून समर्थनप्राप्त दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला. याप्रकरणी पोलिसांनी प्रमुख आरोपीलाअ टक केली आहे. मोठ्या संख्येत हँडग्रेनेड जप्त करण्यात आल्याने दहशतवादी हल्ल्याचा कट हाणून पाडण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. आरोपीने विदेशातील हँडलर्सच्या निर्देशावर आदमपूर, जालंधरनजीक एका डीएलबीकडून हे ग्रेनेड प्राप्त केले होते असे प्रारंभिक चौकशीतून समोर आले आहे. भारतात स्फोट घडवून आणण्याची तयारी करणाऱ्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पोलीस आता अभियान राबवत आहेत. तपास यंत्रणांनी आता या मॉड्यूलशी निगडित विदेशी हँडलर्स, स्थानिक सहाय्यकर्ते, फॉरवर्ड-बॅकवर्ड लिंकचा शोध घेण्यावर लक्ष केंद्रीत करून आहेत. हँडग्रेनेड कुठून मिळविण्यात आले, ते कुणी पोहोचविले आणि संभाव्य हल्ल्यासाठी कुणाला लक्ष्य करण्यात येणार होते याचा तपास आता केला जात आहे.
Comments are closed.