भारतीय अभिनेत्रीसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर जेकब बेथेलने सोडले मौन; म्हणाला…
इंग्लंडचा स्टार क्रिकेटर जेकब बेथेल भारतीय अभिनेत्री आध्या आनंदला डेट करत आहे. आयपीएल 2026 नंतर या चर्चांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. दोघांचे फोटो खूप व्हायरल झाले आणि दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा केला गेला. मात्र बेथेलने या विषयावर मौन सोडत आध्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये आरसीबीकडून खेळणारा जेकब बेथेल नुकताच ‘द सुपर ओव्हर पॉडकास्ट’वर दिसला. याच पॉडकास्टवर त्याच्यासोबत वेस्टइंडिजचा धडाकेबाज क्रिकेटर कार्लोस ब्रॅथवेटही आला होता. यादरम्यान बेथेलने आध्यासोबतच्या नातेसंबंधांच्या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे सांगत फेटाळून लावल्या.
जेकब बेथेल म्हणाला, “मी जेव्हा सोशल मीडियावर माझ्या आणि आध्या आनंदच्या रिलेशनशिपमध्ये असण्याच्या बातम्या पाहिल्या, तेव्हा मला हसू आले. माझी आणि आध्याची भेट एका आयपीएल ॲड शूटदरम्यान झाली होती आणि त्यानंतर आम्ही पुन्हा कधीच भेटलो नाही. आम्ही मित्र बनलो आणि एकत्र फोटोही काढला. आमच्यात रिलेशनशिपसारखे काहीही नाही. नात्यात असण्याच्या सर्व अफवा खोट्या आहेत.”
त्यावेळी असा दावा केला गेला होता की जेकब बेथेल आणि आध्या आनंदची भेट बंगळुरू विरुद्ध मुंबई सामन्यादरम्यान झाली होती. जेकब बेथेल एका भारतीय मुलीला डेट करत असल्याच्या बातम्यांनीही खूप खळबळ उडवून दिली होती, पण आता त्याने स्वतः यावर उघडपणे भाष्य करत रिलेशनशिपच्या बातम्या खोट्या असल्याचे स्पष्ट केले आहे.
जेकब बेथेलबद्दल बोलायचे झाले तर, तो नुकताच भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळताना दिसला होता. पहिल्या 2 वनडे सामन्यांमध्ये तो फ्लॉप ठरला, पण लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या शेवटच्या वनडे सामन्यात त्याने 91 धावांची दमदार खेळी केली होती, आणि इंग्लंडने तो सामना 27 धावांनी जिंकला होता.
Comments are closed.