गुरु-शिष्य नात्याला काळिमा; चौथीतील विद्यार्थिनीसोबत शिक्षकाकडूनच संतापजनक कृत्य, धरणगाव हादरलं

जळगाव धरणगाव क्राईम न्यूज : जळगावच्या धरणगाव तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकानेच इयत्ता चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपी (Dharangaon Crime) शिक्षक नंदलाल नारायण मराठे याच्याविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी ही आपल्या कुटुंबीयांसह धरणगाव तालुक्यातील एका गावात राहते. ती जि. प. शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकत आहे. संशयित आरोपी शिक्षक नंदलाल मराठे हा तिला शाळा भरण्यापूर्वी सकाळी दहा वाजता झाडू मारण्याच्या बहाण्याने शाळेत बोलावून घेत असे. कुणी नसल्याचा फायदा घेऊन तो तिच्यासोबत घृणास्पद कृत्य करायचा. इतकेच नव्हे तर तिला मोबाइलवर अश्लील व्हिडिओ दाखवून तिचा लैंगिक छळ करत असल्याचा संतापपालक प्रकार पुढे आला आहे. (जळगाव क्राईम न्यूज)

Dharangaon Crime : मागील दोन वर्षांपासून सातत्याने मुलीचे लैंगिक शोषण, विरोध केल्यास मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार30 एप्रिल 2026 रोजी शाळेच्या शेवटच्या दिवशी ही या नराधम शिक्षकाने तिच्यावर अत्याचार केला होता. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसांनी आरोपी शिक्षक नंदलाल मराठे विरुद्ध POCSOनुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, शाळेला उन्हाळी सुटी लागल्यानंतर ती सुट्यांमध्ये मावशीकडे गेली असता तिथे तिची तब्येत बिघडली आणि तिने जेवण करणे बंद केले. नातेवाइकांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने रडत रडत तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. हा शिक्षक मागील दोन वर्षांपासून सातत्याने मुलीचे लैंगिक शोषण करत होता. या प्रकाराला विरोध केल्यास तो तिला मारहाण करायचा आणि कोणाला सांगितल्यास तुझे आई-वडील मरून जातील, अशी धमकी देऊन तिला गप्प बसवत असे, असे संबंधित पीडित मुलीचे म्हणणे आहे.

Buldhana : बुलढाण्यात पोलिसांच्या सतर्कतेने बालविवाह रोखला; चाईल्ड हेल्पलाईन आणि पोलिसांची संयुक्त कारवाई

बुलढाणा शहरातील संतनगरी परिसरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून दिला जात असल्याची माहिती ‘डायल ११२’ वर मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करत हा विवाह रोखला. चाईल्ड हेल्पलाईनच्या पथकासह पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता मुलगी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांना कायद्याची जाणीव करून देत पुढील प्रक्रिया पूर्ण केली. बालविवाह हा कायद्याने गुन्हा असून नागरिकांनी अशा प्रकारांची माहिती तातडीने पोलिस किंवा चाईल्ड हेल्पलाईनला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.