ट्रेंड – ‘लाल लाल… बांगडी’ गाण्यावर चिमुकल्याचा भन्नाट डान्स
‘लाल लाल कलरची बांगडी’ या गाण्याची व्रेझ सध्या तरुणाईमध्ये पाहायला मिळत आहे. विविध कंटेंट क्रिएटर या गाण्यावर डान्स करून लाखो लाईक्स आणि ह्यूवज घेत आहेत. मात्र एका चिमुकल्याने या गाण्यावर केलेला डान्स सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बडय़ा बडय़ा डान्सर आणि कंटेंट क्रिएटरला मागे पाडेल असा डान्स या चिमुकल्याने करून सर्व नेटकऱयांना अचंबित केले. त्याने केलेल्या डान्ससह त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकऱयांनी त्याच्यावर काwतुकाचा वर्षाव केला आहे. @gamyirori71 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओला नेटकऱयांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
Comments are closed.