मुंबई-पुणे महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’वर भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू, 4 गंभीर जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई-पुणे महामार्गावरील नव्याने सुरु झालेल्या  ‘मिसिंग लिंक’वर एक अत्यंत भीषण अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वेगवान बसने तीन खाजगी वाहनांना जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला, या अपघातामागचे नेमके कारण शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

Comments are closed.