मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर भीषण अपघाताचा थरार; तिघांचा दुर्दैवी मृत्यू, तर 4 जण गंभ

मुंबई मिसिंग लिंक अपघात : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील नव्याने सुरू झालेल्या ‘मिसिंग लिंक’ परिसरात शुक्रवारी भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू (Missing Link Accident) झालाय. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असून वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. मिसिंग लिंक मार्ग सुरू झाल्यानंतर वाहतूक वेगवान झाली असली तरी अतिवेग आणि निष्काळजी यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून मृतांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (Mumbai Pune Missing Link accident)

अपघातग्रस्त वाहनात अडकलेल्या नागरिकांना हेल्प फाउंडेशन या बचाव टीमकडून गॅस कटरच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवरील टेम्पो आणि बस अपघातानंतर चारही लेन खुल्या करण्यात आल्या आहेत. अडकून पडलेली वाहने तीन लेनवरून सुरू करण्यात आली आहे. अपघातातील वाहने बाजूला करण्यात पोलिसांना उशिरा यश आले असून मुंबई पुणे महामार्गावर मिसिंगलिंक वर सलग 2 अपघात घडले होते. महामार्गावर वाहतूक कोंडी बघता दुसऱ्या लेनवरून वाहने सोडण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून गहाळदुवा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

औंढा नागनाथ येथे भाविकांच्या कारचा भीषण अपघात, पिकअप आणि कारची जोरदार धडक,दोघे गंभीर जखमी

हिंगोली परभणी राज्य महामार्गावर औंढा नागनाथ येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकाच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे या अपघातात कार मधील दोन जण गंभीर जखमी झाले असून जखमीना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे नांदेड वरून औंढा नागनाथ येथे दर्शनासाठी येत असताना औंढा नागनाथ जवळ पिकप व कारचा भीषण अपघात झाला आहे अपघात एवढा भीषण होता की कारचे टायर तुटून थेट बाजूला झाले आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.