लव जिहाद फोफवतोय… जालन्यात धक्कादायक प्रकार, तरुणीचे अश्लील फोटो काढून धर्मांतरासाठी दबाव

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस ठाणे हद्दीत लव जिहादचा गंभीर आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणीचे अश्लील फोटो काढून तिला धमकावत धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी शेख इम्रान शेख हबीब याने तिचे अश्लील फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केले. इतकेच नव्हे तर तिला नमाज पढण्यास भाग पाडणे, बुरखा परिधान करण्याचा दबाव टाकणे अशा प्रकारे धर्मांतरासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. या प्रकरणी तरुणीने पुढे येत पारध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी शेख इम्रान शेख हबीब याच्यासह त्याच्या कुटुंबातील एकूण चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मुख्य आरोपी शेख इम्रान आणि त्याच्या भावाला पोलिसांनी अटक केली असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे. या घटनेचा तपास सखोलपणे केला जात असून, संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास पोलीस अधीक्षकाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Comments are closed.