संतापजनक! बापानेच स्वत: च्या 9 वर्षीय मुलीला संपवलं, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह दिला पेटवून
गुन्हे बातम्या ठेवा: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील देऊळगावराजे परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना आहे. देऊळगावराजे येथील हडगळेवस्तीमध्ये वडिलांनी आपल्या 9 वर्षांच्या मुलीची निर्घृण खून केल्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने मुलीचा मृतदेह साडीत गुंडाळून पेटवून दिला
मिळालेल्या माहितीनुसार, शांताराम चव्हाण (वय 33) याने दारूच्या नशेत आपल्या मुलीवर झाड तोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कटर मशीनने गळ्यावर आणि हातावर वार करत तिची हत्या केली. एवढ्यावरच न थांबता पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने मुलीचा मृतदेह साडीत गुंडाळून पेटवून दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मृत मुलगी ही आरोपीच्या पहिल्या पत्नीची मुलगी होती. तिचा 10 वर्षीय भावासह नुकताच शाळेचा निकाल लागला होता. निकालातील क्रमांकात फेरफार झाल्याच्या कारणावरून आरोपीने संतापाच्या भरात हे अमानुष कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी दौंड पोलिसांनी आरोपीला अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. ही घटना बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी असून परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
परभणीच्या जिंतूर तालुक्यात धक्कादायक घटना, चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीला संपवलं
परभणीच्या जिंतूर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीचा डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील चारठाणा इथं ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीनं स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन कबुली दिली आहे.
चारित्र्यावर संशय घेत पतीने थेट पत्नीच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीच्या जिंतूर तालुक्यातील चारठाणा घडली आहे. घटना घडल्यानंतर आरोपी पतीने पोलीस ठाणे गाठून गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे. सुमित्रा श्रीधर गायकवाड असे 38 वर्षीय मृत महिलेचे नाव आहे. तिचा पती श्रीधर गायकवाड याने तिला घरातून दुचाकीवर बसवून जिंतूर-जालना महामार्गालगत असलेल्या गट क्रमांक 8 मधील शेतातील आखाड्यावर नेले. तिथे गेल्यानंतर त्याने प्रथम काठीने मारहाण केली. त्यानंतर संतापाच्या भरात पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिची जागीच हत्या केली.
दरमयान, घटना घडल्यानंतर पती श्रीधर याने स्वतः चारठाणा पोलीस ठाणे गाठून संपूर्ण प्रकाराची माहिती देत गुन्ह्याची कबुली दिली.
महत्वाच्या बातम्या:
चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीला संपवलं, धक्कादायक घटनेनं परभणी हादरलं, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
आणखी वाचा
Comments are closed.