ज्यांनी पहिल्यांदाच याद्या बघितल्या त्यांच्यावर काय बोलावं? गोरेंनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली
जयकुमार गोरे राज ठाकरेंवर निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार यादीत नव्याने 96 लाख बोगस मतदार घुसवले आहेत, असा खळबळजनक आरोप मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला. मला असं कळालं की, 1 जुलैला निवडणूक आयोगाने (Election Commission) मतदारांची यादी बंद केली. त्यानंतर महाराष्ट्रात मतदारांच्या यादीत 96 लाख खोटे मतदार भरले आहेत, अशी माहिती मला खात्रीलायक सूत्रांनी दिल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या आरोपाची सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore ) यांनी खिल्ली उडवली आहे. ज्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच याद्या बघितल्या त्यांच्यावर काय बोलावे, असा टोला गोरे यांनी राज ठाकरेंना लगावला. पूर्वी ईव्हीएम मशीनवर खापर फोडले आता मतदार यादीवर. पराभव होण्यापूर्वीच कारणे शोधायला सुरुवात झाल्याचे जयकुमार गोरे म्हणाले.
सध्या मतदार यादीवरून आक्रमक भूमिका घेणाऱ्या राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्या आरोपांची ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार खिल्ली उडवली आहे. राज ठाकरे यांनी निवडणुका न घेऊ देण्याच्या आव्हानांवर बोलताना मंत्री गोरे म्हणाले की ज्यांनी आयुष्यात मतदार याद्या पहिल्यांदा पाहिल्या त्यांना हे कस काय कळाले. आधी मतदार याद्या वाचल्या पाहिजेत. तपशील तपासले पाहिजेत. मग या गोष्टी कळतील असे गोरे म्हणाले. संजय राऊत यांच्या मोर्चा काढण्याच्या वक्तव्यावर बोलताना त्यांच्या हातात आता काही राहिले नाही. जनता सोबत नाही. निवडणुकीत पराभव होणार याची खात्री पटली आहे. निवडणुकीपासून पळायचे आहे. आजपर्यंत ईव्हीएमवर फोडले जाणारे खापर आता मतदार यादीवर फोडायचे आहे. ही लोकं अस्वस्थ झाली आहेत. जनाधार गमावलेली आहेत अशी टीका जयकुमार गोरे यांनी केली.
दिवाळीपूर्वी माढा तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबीयांना दिवाळी किट वाटप
सोलापूर जिल्ह्याला महापुराचा फटका बसल्यानंतर आज दिवाळीपूर्वी माढा तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबीयांना दिवाळी किट आणि भाऊबीज भेट वाटपाला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमासाठी आज पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते. त्यांनी माढा तालुक्यातील केवड, उंदरगाव आणि वाकाव या गावांना भेटी दिल्या, यावेळी ते बोसत होते. पूरग्रस्त भागातील प्रत्येक कुटुंबासाठी मुख्यमंत्र्यांचे पत्र दिले जाणार असून यामध्ये शासन आणि देवा भाऊ तुमच्या पाठीशी आहे शासनाने जाहीर केलेले पॅकेज ची नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी तुमच्यापर्यंत पोचविण्याचा शासन प्रयत्न करीत असल्याचे या पत्रात म्हटले आहे.
18 पदार्थांचे किट आणि भाऊबीज म्हणून लाडक्या बहिणींना साडी आणि पुरुषाला पोशाख याचे वाटप सुरू
आज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते माढा तालुक्यातील उंदरगाव, केवड, वाकाव या गावात डीपीडीसीच्या माध्यमातून बनविण्यात आलेले 18 पदार्थांचे किट आणि भाऊबीज म्हणून लाडक्या बहिणींना साडी आणि पुरुषाला पोशाख याचे वाटप सुरू झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबासाठी मुख्यमंत्र्यांच्या सहीचे पत्र बाधित कुटुंबाचे नाव टाकून दिले जाणार आहे. याच पत्रात मुख्यमंत्र्यांनी तुमचा देवा भाऊ तुमच्या पाठीशी असल्याचे सांगत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.