‘माझी गॅरंटी घेऊ नका, माझे काही खरे नाही’ म्हणणाऱ्या जयंतरावांनी बारामतीच दिले स्पष्टीकरण, म्हण
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पक्षांतराबाबत चर्चांना उधाण आले आहे. त्यातच आज जयंत पाटील हे शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीमध्ये दाखल झाले. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीत 2023 मध्ये फूट पडल्यानंतर जयंत पाटलांनी पवारांची साथ सोडली नाही. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये जयंत पाटील आणि रोहित पवारांमध्ये सुप्त राजकीय संघर्ष असल्याची चर्चा सुरू आहे. त्यानंतर आता ते लवकरच अजित पवारांसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर आज जयंत पाटील यांनी बारामतीत शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आज माध्यमांशी बोलताना अनेक गोष्टींबाबत भाष्य केलं आहे.या वेळी त्यांनी माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही या वक्तव्यावर सुरू झालेल्या चर्चांवर देखील स्पष्टपणे भाष्य केलं आहे.
मी नाराज नाही मला बाहेर बोलायची चोरी झाली आहे. मी जे भाषण केले त्याचा रेफरन्स तुम्ही काढून बघा. शक्तीपीठ रस्त्याला विरोध करण्यासाठी जो मोर्चा आलेला त्यांच्यासमोर मी भाषण करताना मी सांगितले की, कालांतराने लोक कॉम्पेन्सेशन वाढलं की ते घेतात आणि गप्प बसतात. राजू शेट्टी यांनी हा झेंडा हातात घेतलाय म्हटल्यानंतर काळजीच कारण नाही, असा तो विनोदाचा भाग होता. त्यामुळे तुम्ही तुमचा आंदोलन कंटिन्यू करा तुमच्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. त्यानंतर एकाच तासात मी त्याबाबत स्पष्टीकरण प्रसारमाध्यमांना दिले आहे. त्यामुळे सगळ्या प्रसारमाध्यमांनी ठरवलेलं दिसतंय की, मला काहीही करून कुठेतरी ढकलायचं, अशी मिश्किल प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिली आहे.
विखे पाटलांच्या वक्तव्यावर म्हणाले…
आम्ही सर्व एका कुटुंबातील आहोत. एकमेकांना इशारा देऊन बसत नाही. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष आहे. आज आमचा पराभव झाला आहे. कदाचित निवडून आलेल्यांची संख्या जरी कमी असली तरी महाराष्ट्रात पवार साहेबांच्यासाठी त्यांच्यावर प्रेम असणारे लाखो लोक आहेत. जो काही असेल तो पक्षाच्या हिताचा निर्णय एकत्रित करू. एकट्याने इकडे जाणे तिकडे जाणं हा विषय आम्ही चर्चेला घेऊ शकत नाही आणि तो होणारही नाही, असंही जयंत पाटलांनी म्हटलं आहे. माझे सगळ्याच पक्षांशी चांगले संबंध आहेत. राजकारणात सर्वांशी संबंध चांगले आहेत आणि ते चांगले ठेवणे हे मी पवार साहेबांकडून शिकलेलो आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे म्हणाल्या, जयंत पाटील सर्वांना हवेहवेसे ते योग्यच आहे.
काय म्हणाले होते जयंत पाटील?
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपली भूमिका मांडली. त्यावेळी, राजू शेट्टींचा सदर्भ देत त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. माझी गॅरंटी घेऊ नका, माझ काही खरं नाही, असे जयंत पाटील यांनी आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनात उपस्थित राहून म्हटले.
अधिक पाहा..
Comments are closed.