जयंत पाटलांना त्यांच्या घरी कोणी विचारत नाही म्हटलं तर चालेल का? जयकुमार गोरेंचा पलटवार

जयकुमार गोरे जयंत पाटलांवर : सातारा सांगली विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील यांनी दोन्ही राजांबद्दल केलेल्या वक्तव्यावर आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार पलटवार (जयंत पाटील यांच्यावर जयकुमार गोरे) केला. जयंत पाटील यांनी काय बोलावं हा त्यांचा विषय आहे. पण मी जर त्यांना त्यांच्या घरात कोणी विचारत नाही असे म्हटले तर कसे चालेल का? अशा शब्दात गोरे यांनी टोलेबाजी केली. सांगली सातारा विधान परिषदेमध्ये धैर्यशील कदम यांची उमेदवारी पक्षाने आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाहीर केलेली आहे. आम्ही सगळ्यांनी ती स्वीकारली आहे असे गोरे म्हणाले.

मी इकडे अडकलेले असताना दोन्ही राजांनी फ्रंट फुटवर राहून ही निवडणूक हाताळली आहे. त्यामुळं विरोधकांचे काम असते कुठे काही फट सापडती आहे का ते शोधणे.  जयंत पाटील तर कसलेले राजकारणी आहे अशी शेरेबाजी देखील गोरे यांनी केली.

रोहित पवारांचे पंढरपुरातील आंदोलन म्हणजे स्टंट आणि नौटंकी, जयकुमार गोरेंची टीका

शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. सरकारचे रोहित पवारांनी अभिनंदन केले पाहिजे. पण , रोहित पवार राजकीय आंदोलन करत आहेत. हे आंदोलन म्हणजे रोहित पवारांची स्टंटबाजी आणि नौटंकी आहे अशी टीका यावेळी जयकुमार गोरे यांनी केली. रोहित पवार हे 12 जून पासून पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. याबाबत जयकुमार गोरे यांना विचारले असता त्यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला.

नेमकं काय म्हणाले होते जयंत पाटील?

सांगली सातारा विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये साताऱ्याच्या दोन्ही राजांना (खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले) विचारत न घेताच निर्णय घेतले जात असावेत असा माझा अंदाज असल्याचं वक्तव्य शरद पवार गटाचे नेते जंयत पाटील यांनी व्यक्त केला आहे. यामुळे दोन्ही राजेंचा स्वाभिमान दुखावला गेला असून, अशा गोष्टी खपवून घेणे हा उदयनराजेंचा स्वभाव नाही, असे पाटील म्हणाले. सातारकरांनी आपला स्वाभिमान काय आहे? हे या निवडणुकीत मतदानातून दाखवून द्यावे असे आवाहन  जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.साताऱ्याच्या दोन्ही राजेंचा स्वाभिमान दुखावला आहे. त्यामुळं सातारकरांनो आपली ताकद दाखवून द्यावी असे जयंत पाटील म्हणाले. शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सांगली सातारा विधान परिषदेचा उमेदवार निवडताना महायुतीकडून दोन्ही राजेंना डावलल्याचा अंदाज केला व्यक्त केला.

Comments are closed.