नाशिक विधानपरिषद निवडणूक! गोकुळ गिते माघार घेणार? मुंबईत मंत्री महाजनांसह सामंतांशी चर्चा
नाशिक विधान परिषद निवडणूक: विधान परिषदेत नाशिकच्या (नाशिक विधान परिषद निवडणूक) जागेवरुन महायुतीत (Mahayuti Alliance) वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कारण नाशिकच्या जागेवर बंडखोरी करणाऱ्या गोकुळ गिते (Gokul Gite) यांनी अद्याप माघार घेतलेली नाही. शिवसेनेचे नेते उदय सामंत आणि भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) हे दोन्हीं मंत्री तीन दिवसापासून नाशिकमधे तळ ठोकून होते. काल त्यांच्या जोडीला मंत्री दादा भुसे देखील होते. तिन्ही महत्वाचे मंत्री आपल्या विभागाचा कारभार सोडुन बडखोरांची मनधरणी करण्यात व्यस्त होते. त्यात अल्पसं यश आलं खरं आणि प्रसाद हिरे यांनी माघार घेतली. मात्र गोकुळ गिते अजूनही निवडणुकीच्या मैदानात शड्डू ठोकून आहेत. अशातच मंत्री गिरीश महाजन मंत्री उदय सामंत यांनी गणेश गीते आणि गोकुळ गिते यांच्यांशी मुबंईत आज चर्चा केली.
गोकुळ गिते यांच्या उमेदवारीने महायुतीची डोकेदुखी वाढली
गोकुळ गिते यांच्या उमेदवारीने महायुतीची डोकेदुखी वाढली होती. दोन्ही मंत्र्यांसोबत गिते बंधूंची सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. गोकुळ गिते आपली तलवार म्यान करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्या नाशिक मध्ये दोन्ही मंत्री पत्रकार परिषदेत अंतिम निर्णय सांगणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दिल्लीत असल्याने गोकुळ गीतेची भेट होऊ शकली नाही. उदय सामंत आणि गिरीश महाजन उद्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. दोन्ही मंत्र्यांच्या उद्याच्या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Who is Gokul Gite?: कोण आहेत गोकुळ गीते?
गणेश गीते यांनी माघार घेतली असली, तरी गोकुळ गीते यांच्या उमेदवारीमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष नाशिककडे लागले आहे.
– गोकुळ गीते हे नाशिकचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांचे भाऊ आहेत.
– गणेश गीते यांच्या संपूर्ण राजकीय वाटचालीत गोकुळ गीते यांचा पडद्यामागून मोठा हातभार राहिला आहे.
– नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत गणेश गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवली होती. या संपूर्ण निवडणुकीचे नियोजन आणि कॅम्पेन गोकुळ गीते यांनीच सांभाळले होते.
– गोकुळ गीते हे पिंपळगाव बाजार समितीवर सलग दोन वेळा संचालक म्हणून निवडून आले आहेत, तर सध्या त्यांची सायखेडा गटातून जिल्हा परिषद निवडणुकीची पूर्वतयारी सुरू आहे. स्थानिक पातळीवर त्यांची मोठी ताकद मानली जाते.
अभिजीत दिपके झुरळ जनता पार्टी पीसी : आता मी एक नाही, लाखो तरुण माझ्यासोबत आहेत : अभिजीत दिपके
Comments are closed.