धनंजय मुंडेच वाल्मिक कराडचा बाप ,जेलमध्ये पोलीसच वाल्मिकच्या कोठडीत जाऊन मालिश: जितेंद्र आव्हाड

जितेंद्र owhad: संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मागे वाल्मिक कराड आहे आणि त्याचा बाप धनंजय मुंडे आहे .संतोष देशमुख यांचे हत्येचे व्हिडिओ वाल्मिक कराड पहात होता . हे हरामी, नालायक, जल्लादांनी लघूशंका केली. वाल्मिकची गॅंग त्याच्या बेरेकमध्ये जाऊन त्याची मालिश करतात .असा गंभीर आरोप करत जितेंद्र आव्हाड यांनी केलाय . याआधीही दोन-तीन वर्षांपूर्वी पोलिसांची भूमिका संशयास्पदच असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले .

दरम्यान , देशमुख कुटुंबीयांनी वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप केलाय . कराडच्या बराकीमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे खुद्द कारागृह प्रशासनानेही कबूल केले आहे .तांत्रिक कारण देत करत चार दिवस दुरुस्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आल्यानंतर मोठी खळबळ उडाली .दरम्यान दुसरीकडेसीआयडीने दाखल केलेल्या दोषारोप पत्रातील धक्कादायक तपशील समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय .संतोष देशमुख यांना हाल हाल करून मारताना चे व्हिडिओ फोटो आणि फोनवरील संभाषणाचा ऐवज समोर आलाय .दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे यांचंच पाठबळ वाल्मिकला असल्याचा आरोप केला जातोय .धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा मोठा दबाव आहे .

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ?

वाल्मिक ज्या जेलमध्ये आहे, त्याच्या गॅंगमधील काही लोक छोट्या गुन्ह्यांमध्ये स्वतःला अटक करून घेतात .कोर्टात जाऊन जेल कस्टडी होते आणि बरोबर वाल्मिक ज्या कोठडीत आहे तिथे पोहोचतात . मग त्याची मालिश करतात .त्याला चहा येतो .त्याला खास जेवण येतं .लघुशंका करता तुम्ही लाज नाही वाटत? असा सवाल ही आव्हाडांनी केला . आपण सगळे दोन दिवसात आपापल्या आयुष्यात पुन्हा लागू पण हे फोटो व्हिडिओ जेव्हा देशमुख यांचे कुटुंब बघेल .आयुष्यभर त्यांनी डोळ्यासमोर हे घेऊन जगायचं की आपल्या बापाला असं मारलं ..

धनंजय मुंडे यांचा राजीनामा हे सरकार घेणार नाही .त्यांचा राजीनामा घेतील यावर माझा विश्वास नाही .त्यामुळे मी राजीनामा मागे नाही बंद केलाय .या कुरघोडींना महाराष्ट्र माफ करणार नाही .या सगळ्याचा बाप एकच आहे वाल्मिक कराड .आणि वाल्मिक कराड चा बाप धनंजय मुंडे . वाल्मिक कराड माझ्या जातीचा पण माझी जात इतकी क्रूर होऊ शकत नाही .या हत्याच्या मागे वाल्मिकच आहे .त्याने अशा अनेक हत्या केल्या आहेत .मी मुंबईत गॅंगवर पाहत होतो मात्र या विरोधात भूमिका घेणारे होते मात्र वाल्मिक विरोधात कोणीही बोलायला तयार नाही कारण हा बाहेर आल्यावर मारेल .मुख्यमंत्र्यांनी जर ठरवलं तर आता अकरा वाजता फ्लॅश येईल धनंजय मुंडे यांचा राजीनामा .आम्ही रोज हा मुद्दा मांडणार आहोत .असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले .

अधिक पाहा..

Comments are closed.