हा कोण गोट्याफोट्या, याला कोण भीक घालतंय; फरार गोट्या गित्तेच्या इशाऱ्यानंतर जितेंद्र आव्हाड कड

Jitendra Awhad on Gotya Gitte : महादेव मुंडे हत्या प्रकरणात (Mahadev Munde Case) फरार असलेला संशयित आरोपी गोट्या गित्ते सध्या (Gotya Gitte) सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये गोट्या गित्तेने थेट रेल्वे रुळावर बसून आत्महत्येचा इशारा दिला आहे. व्हिडीओमध्ये बोलताना गोट्या गित्ते म्हणतो, “वाल्मिक कराड (Walmik Karad) हे साक्षात विठ्ठलाचे रूप आहेत, तर बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी बबन गित्तेने पोलिसांपुढे शरण जावे.” तसेच, जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी माझ्यावरील आरोप थांबवावेत, अन्यथा “मी आत्महत्या करेन आणि त्याला जबाबदार फक्त जितेंद्र आव्हाड असतील,” असा गंभीर इशाराही त्याने या व्हिडीओतून दिला आहे. आता यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की,  गेल्या अनेक दिवसांपासून गोट्या गित्ते हा मला धमकी देण्याचे काम करतोय. वाल्मिक कराड याचा उजवा हात म्हणून तो ओळखला जातो. बापू आंधळे खून प्रकरणात देखील त्याचा सहभाग होता. इन्स्पेक्टर महाजन याने गित्तेलाही वाचवण्याचे काम केले आहे. गित्ते हा नामचीन गुंड आहे. त्याला घाबरणार मी नाही. महादेव मुंडे याच्या खून प्रकरणात देखील मुख्य सूत्रधार तोच होता, असा आरोप त्यांनी केला आहे.

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, महादेव मुंडे यांचं खून प्रकरण त्यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी लावून धरल्याने सगळी गँग अडचणीत आली आहे. त्यात मोठमोठ्यांची नावे आहेत. तिलाही ऑफर कोणी दिली आहे. जी 12 गुंठे जमीन आहे, महादेवचा खून झाला, ती जमीन तुझ्या नावावर करतो. तू हे प्रकरण बंद कर, असा दावा देखील त्यांनी केलाय.

हा कोण गोट्याफोट्या, याला कोण भीक घालतंय

वंजारी सर्टिफिकेटची मला गरज नाही. मी ओरिजनल वंजारी आहे. रक्तात वंजारीचं खून आहे. माझे आजोबा वारकरी होते. आमचं घराणं अतिशय धार्मिक आहे. वंजारीची ओळख म्हणजे कष्टाचा दुसरं नाव आहे. मुंबई सेंट्रलचा हमालांमध्ये 90 टक्के वंजारी आहे. कल्याणमधील हमाल वंजारी आहेत. हे वंजारींना बदनाम करून टाकतील. या गँगने समाजाला बदनाम करून टाकलं. समाजाला कुठेतरी विरोधक म्हणून उभं केलं. वंजारी कुणाचा विरोधक नाही. बीड म्हणजे भगवान बाबाला मानणारे आहे. भगवान बाबा म्हणजे सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालणारे आहेत आणि हे काय मला सांगतात वंजारी बदनाम करून टाकला. धमक्यांना घाबरून मी माझं बोलणं बंद करणार नाही. हा कोण गोट्याफोट्या, याला कोण भीक घालतंय, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी गोट्या गित्तेवर केला.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Beed crime Gotya Gitte:’भाई तुम बडे, भाई सॉरी सॉरी…’; जितेंद्र आव्हाडांनी फोनवर माझी मागितली होती; गोट्या गित्तेचा व्हिडीओ व्हायरल

आणखी वाचा

Comments are closed.