संभाजी महाराजांना वगळून औरंगजेबला मानवतावादी सांगत इतिहास रंगवला; JNUच्या कुलगुरूंची टीका

नागपूर बातम्या: भारतीय इतिहासातून छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांना वगळून औरंगजेबला (Aurangzeb) मानवतावादी सांगत त्याचा सोनेरी इतिहास रंगवला असल्याची जोरदार टीका जेएनयुच्या (JNU) कुलगुरू डॉ. शांतीश्री यांनी केली आहे. सावरकर हे मानवतावादी वैज्ञानिक होते. मात्र, त्यांना इतिहासात सांप्रदायिक (Communal) सांगण्यात आले. तसेच छत्रपती संभाजी महाराज यांचा तर भारतीय इतिहासाच्या पुस्तकात कुठेही उल्लेख करण्यात आला नाही. त्याउलट औरंगजेबला धर्मनिरपेक्ष, मानवतावादी, दयाळू असं सांगण्यात आलं, असेही जेएनयूच्या कुलगुरू डॉ. शांतिश्री धुलीपुडी पंडित (JNU VC Dr. Shantishree Pandit)  म्हणाल्या.

परदेशी घुसखोरांना, त्यांच्या धर्माला सोनेरी रंग देऊन चमकवण्यात आलं

डॉ. शांतीश्री यांनी काल (28 फेब्रुवारी) नागपूरच्या विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्राद्योगिक संस्थान (VNIT) मध्ये आयोजीत  “भारतीय ज्ञान प्रणाली विज्ञान व तंत्रज्ञान दृष्टिकोन”  विषयावर आयोजित राष्ट्रीय संमेलनात हजेरी लावली. त्यावेळी त्या बोलत होत्या. भारतीय इतिहासातून भारताचा सांस्कृतिक गौरव असलेले अनेक मुद्दे ऐतिहासिक तथ्य नाकारून, भारताच्या सांस्कृतिक भौगोलिक ऐक्याला नाकारून काढ्यात आलं, असेही डॉ. शांतीश्री म्हणाल्या. परकीय इतिहासकारांनी भारताची प्रतिमा कुठलाही सांस्कृतिक वारसा नसलेला देश, फक्त लोकांची गर्दी असलेला जमिनीचा तुकडा, अशी निर्माण केली. तर भारतावर हल्ला करणाऱ्या परदेशी घुसखोरांना, त्यांच्या धर्माला अगदी सोनेरी रंग देऊन चमकवण्यात आल्याची टीकाही डॉ. शांतीश्री यांनी यावेळी केली.

महापुरुषांच्या अवमान प्रकरणी नागपूरकर उतरले रस्त्यावर

महापुरुषांचा अवमान करणाऱ्या विरोधात राज्यात कठोर कायदा करा, अशी मागणी करत नागपुरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे. नागपूरच्या महाल परिसरातील शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौकावर त्या संदर्भातले फलक लावण्यात आले असून सामान्य नागपूरकर येता जाता त्यावर स्वाक्षरी करून सरकारकडे कठोर कायद्याची मागणी करत आहे. विशेष म्हणजे नागपूरच्या प्रशांत कोरटकर नावाच्या इसमाने इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोन करून धमकीच दिली नाही, तर महापुरुषांचा अपमान केल्याचा आरोप होत आहे. कोल्हापूर आणि नागपूर पोलीस त्या संदर्भातला तपास करत असताना सामान्य नागपूरकरांनी सुरू केलेली ही स्वाक्षरी मोहीम सध्या लक्ष वेधून घेत आहे. दुसरीकडे महापुरुषांचा अवमान करणाऱ्या आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला अटक करावी, तसेच महापुरुषांच्या अवमान प्रकरणी कठोर कायदा करण्यात यावा, या मागणीसाठी शिवप्रेमी कार्यकर्ते तसेच सकल मराठा समाजाकडून नागपुरात बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे. महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही रॅली सुरू होणार आहे.

हे ही वाचा

अधिक पाहा..

Comments are closed.