ENG vs PAK: पाकविरुद्ध लॉर्डसवर जो रूट इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर! WTC मध्ये ही कामगिरी करणारा ठरणार पहिला खेळाडू

इंग्लंड आणि पाकिस्तान (England vs Pakistan) यांच्यातील कसोटी मालिकेचा दुसरा सामना 27 ऑगस्टपासून लॉर्ड्सच्या ऐतिहासिक क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूट (Joe Root) याच्याकडे एक मोठी कामगिरी करण्याची संधी असेल. या सामन्यात तो WTC मध्ये 700 चौकार मारणारा पहिला फलंदाज बनू शकतो. ही कामगिरी करण्यासाठी त्याला लॉर्ड्स कसोटीत फक्त 1 चौकार मारण्याची गरज आहे. याआधी WTC च्या इतिहासात एकाही फलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाही.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (WTC) सर्वाधिक चौकार मारणाऱ्या फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर, जो रूट 78 सामन्यांत 699 चौकार मारून पहिल्या क्रमांकावर आहे. लॉर्ड्स कसोटीत एक चौकार मारून तो 700 चौकार मारणारा पहिला फलंदाज ठरेल. तर या यादीत मार्नस लाबुशेन (Marnus Labuchesn) दुसऱ्या क्रमांकावर आहे. या ऑस्ट्रेलियन फलंदाजाने WTC मध्ये आतापर्यंत 60 सामन्यांत 510 चौकार मारले आहेत. रूट आणि लाबुशेन यांच्यात 189 चौकारांचे अंतर आहे.

WTC मध्ये सर्वाधिक चौकार मारण्याच्या बाबतीत स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गज फलंदाजाने आतापर्यंत 61 सामन्यांत 506 चौकार मारले आहेत. या यादीत ऑस्ट्रेलियाचाच ट्रेव्हिस हेड (Travis Head) चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने WTC च्या आतापर्यंत 59 सामन्यांत 496 चौकार ठोकले आहेत. इंग्लंडचा जॅक क्रवली या यादीत पाचव्या स्थानावर आहे. त्याने WTC मध्ये आतापर्यंत 57 सामन्यांत 458 चौकार मारले आहेत.

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना लीड्सच्या हेडिंग्ले स्टेडियमवर खेळवला गेला होता. या सामन्यात इंग्लंडने एक डाव आणि 103 धावांच्या मोठ्या फरकाने दणदणीत विजय मिळवला होता. आता दुसऱ्या सामन्यातही इंग्लंडला हीच लय कायम राखायची आहे, तर पाकिस्तानचे लक्ष पुनरागमन करण्यावर असेल. या सामन्यापूर्वी इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्स (Bridon Carse) नाईट क्लब विवादामुळे या सामन्यातून बाहेर पडला असून, त्याच्या जागी सोनी बेकरचा संघात समावेश करण्यात आला आहे.

Comments are closed.