रोहित-विराटशिवाय न्यूझीलंड दौरा सोपा नसणार! WTC फायनलवर राहुल द्रविड यांची मोठी भविष्यवाणी

टीम इंडिया (Team india) सध्या श्रीलंकेत कसोटी मालिका खेळत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2025-27 च्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला इथून पुढे जवळपास प्रत्येक सामना जिंकावा लागणार आहे. यादरम्यान, टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचे मत आहे की, टीम इंडियासाठी WTC च्या या चक्रात फायनल गाठणे सोपे असणार नाही. सध्या भारतीय संघ WTC च्या पॉइंट्स टेबलवर पाचव्या स्थानावर आहे.

द्रविड यांच्या मते, भारतीय संघाने इथून आगेकूच करून फायनल गाठली, तर ती एक शानदार कामगिरी ठरेल. राहुल द्रविड यांनी ETPL स्पर्धेदरम्यान जिओस्टारशी बोलताना सांगितले की, ‘मला आशा आहे की टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचेल. भारताने इथून डब्ल्यूटीसी फायनलसाठी पात्रता मिळवली, तर ती खूप मोठी गोष्ट असेल. भारत सध्या थोडा मागे आहे, पण संघात ज्या दर्जाचे खेळाडू आहेत, त्यांना तुम्ही कधीही कमी लेखू शकत नाही.

श्रीलंकेविरुद्ध त्यांची सुरुवात चांगली झाली, ही निश्चितच चांगली गोष्ट आहे आणि आशा आहे की टीम इंडिया दुसऱ्या कसोटीतही श्रीलंकेचा पराभव करेल.’ भारताने पहिल्या कसोटीत श्रीलंकेचा 165 धावांनी पराभव केला होता.

भारताला ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडचा दौरा करायचा आहे. या दौऱ्यावर टीम इंडिया दोन कसोटी सामने खेळणार आहे. याशिवाय दोन्ही संघांमध्ये 5 टी-29 आणि तितकेच वनडे सामनेही खेळवले जातील. या दौऱ्याबाबतही राहुल द्रविड यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

द्रविड म्हणाले की, न्यूझीलंडमध्ये विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारासारख्या खेळाडूंची उणीव भासेल. त्यांच्या घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध खेळणे नेहमीच आव्हानात्मक असते, कारण न्यूझीलंडचा संघ तगडी टक्कर देतो. भारताच्या अनेक युवा खेळाडूंनी न्यूझीलंडसारख्या कठीण परिस्थितीत खेळलेले नाही, त्यामुळे ही एक मोठी परीक्षा असेल.

द्रविड पुढे म्हणाले, मला आशा आहे की भारतीय खेळाडू या दौऱ्यासाठी पूर्णपणे फिट असतील. पण आम्हाला विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांसारख्या अनुभवी खेळाडूंची उणीव नक्कीच भासेल. भारताने मागच्या वेळी न्यूझीलंडचा दौरा केला होता, तेव्हा हे खेळाडू संघात होते. त्यामुळे ही मालिका अतिशय रंजक ठरेल.

त्यांनी असेही सांगितले की, अगदी ऑस्ट्रेलियाविरुद्धची घरेलु मालिकाही सोपी असणार नाही, कारण त्यांच्या संघातही जानेवारीत होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक असलेले खेळाडू असतील.

Comments are closed.