साहेबांचा आदेश आला की तुडवणार, शिवसेनेच्या रणरागिणीने व्यक्त केल्या भावना

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ज्या ओमराजे निंबाळकर यांना मी भावासारखं मानत होती. वाटलं नव्हतं तो विश्वासघात करेल. मला रडू येतंय. वाईट वाटतंय. पण मला अजूनही वाटतं तो येईल कुठून तरी. तो वाघ होता. शेतकऱ्यांसाठी काम करणारा होता. अरे, त्याने तर सगळ्यांना सांगितलं होतं. मला विकत घेण्याचा प्रयत्न केला तर बघा. मग आता काय केलेस रे… शेवटी विकला गेलास ना… माझ्या साहेबांना तू धोका दिलास. वाईट वाटतं. माझ्या साहेबांचा त्याने घात केला. हा घात नाही सहन होत आता. पण आता आम्ही रडणार नाही. आता लढायचंय आम्हाला. फक्त साहेबांचा आज आदेश आला पाहिजे की, यांना तुडका. आम्ही तुडवणार. आता आमच्या रक्तामध्ये आणि हातातील भगव्याची ताकद वाढवणार. त्यासाठी जिवाचं रान करणार, ‘जिथे ठाकरे, तिकडे निष्ठा… जिथे निष्ठा तिथेच शिवसैनिक’ हा बॅनर झळकावत मरेपर्यंत आम्ही शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहू, अशा भावना भायखळामधून आलेल्या शिल्पा म्हात्रे या शिवसेनेच्या रणरागिणीने व्यक्त केल्या.

आम्ही ठाकरेंचे निष्ठावंत…

जालना येथून आलेल्या अंकुश पवार या निष्ठावंत शिवसैनिकाने परिधान केलेले ‘आम्ही ठाकरेंचे निष्ठावंत…’ हे बॅनर सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय ठरले. तांदळातून जसे खडे बाजूला केले जातात तसे शिवसेनेतून आता गद्दार बाजूला गेले आहेत. आम्ही निष्ठावंत कायम ठाकरे यांच्यासोबत आहोत, असे ते म्हणाले.

Comments are closed.