जसे मी बोलले, धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मो
धनंजय मुंडे वर करुणा शर्मा: 2024 च्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी शपथपत्रात करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्या मिळकतीबाबत उल्लेख केला नव्हता. त्यामुळे करुणा शर्मा यांनी ऑनलाइन तक्रार केली होती. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीवर आज परळी न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणी आधीच करुणा शर्मा यांनी मोठा दावा केलाय. सहा महिन्यात धनंजय मुंडेंची आमदारकी जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
करुणा शर्मा म्हणाल्या की, सगळ्यांनी निवडणुकीवेळी बघितले आहे की, मुंडेंनी 200 बूथ कॅप्चर केले आहे. तसे निवडणुकीत माझे नाव टाकले नाही, आमच्या केसचा संदर्भ दिला नाही. 2014 पासून माझे नाव आणि माझ्या मुलाबाळांचे नाव टाकले नाही. यावर निवडणूक अधिकारी, कलेक्टर कोणीच ऑब्जेक्शन घेतले नाही. 2024 मध्ये माझ्या मुलांचे नाव टाकले आणि माझे नाव गायब केले. या सर्वावर माझी लढाई सुरू आहे. आता त्यांचे वॉरंट निघेल, त्यांना सहा महिन्यांची शिक्षा होईल. आज स्वतः धनजय मुंडे यांना जावे लागणार आहे. जसे मी बोलले होते की, मंत्रीपद जाणार तर ते गेले. आता मी सांगते की, आमदारकीही जाणार आहे. सहा महिन्यात त्यांची आमदारकी जाईल, असा दावा त्यांनी केला आहे.
भ्रष्ट लोकांना मंत्रालयात बसविले तर काय न्याय मिळणार?
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना शिक्षा दिली तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पुन्हा घेण्याची वेळ येईल आणि जनतेचा पैसा खर्च होईल, असे निरीक्षण नाशिक सत्र न्यायालयाने नोंदवले आहे. खर्च टाळण्यासाठी माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत विचारले असता करुणा शर्मा म्हणाल्या की, लोकांच्या पैशांचा गैरवापर आणि लोकांचे पैसे जाणे, हे आहे. पण, भ्रष्ट लोकांना मंत्रालयात बसविले तर काय न्याय मिळणार? त्यामुळं हे गेले पाहिजे. माझ्या पक्षाच्या माध्यमातून मी मुद्दा घेऊन याचिका दाखल करणार आहे, असे त्यांनी म्हटले.
वाल्मिक कराड आणि आमदार, मंत्र्यांचेही घर तोडायला पाहिजे
आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेला पोलिसांनी अटक केली आहे. बीड आणि उत्तरप्रदेश पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत त्याला ताब्यात घेतलं. सतीश भोसलेने शिरूर येथील वन विभागाच्या जागेवर बेकायदेशीररीत्या बांधलेले निवासस्थान गुरुवारी अधिकाऱ्यांनी पाडले. घरावर तोडक कारवाई झाल्यानंतर अज्ञातांनी घराला आग लावली, त्याचबरोबर आमच्यावर हल्ला केल्याचा दावा भोसलेच्या नातेवाईकांनी केला आहे. याबाबत विचारले असता करुणा शर्मा म्हणाल्या की, कोणाचंही घर कधीही तोडणं, जाळणं नको. कोणत्याही व्यक्तीचे घर जाळणे, तोडणे हा अधिकार नाही.खरं घर जळायचं, तोडायचं असेल तर मंत्री, आमदाराचं तोडा. हे लोक मुलांना गुंड प्रवृत्तीमध्ये नेत आहेत. वाल्मिक कराडचे घर का नाही तोडले? बीडची परिस्थिती बिकट होती. पण, आता एसपी साहेबांनी ती आटोक्यात आणली पाहिजे. खोक्याचे घर तोडले आता वाल्मिक कराड आणि आमदार, मंत्र्यांचेही घर तोडायला पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38
अधिक पाहा..
Comments are closed.