केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांन

पुणे: पुण्यातील प्रसिद्ध लोहगडावरून दरीत ढकलून केतन अग्रवाल याला संपवण्यात आलं होतं. केतनसोबत लग्न करण्यास नकार देता येत नसल्याने सिया गोयल हिने तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी याच्या मदतीने हा खून केला होता. आज, १८ जुलै २०२६ रोजी केतनच्या मृत्यूला एक महिना पूर्ण झाला आहे. या निमित्ताने केतनच्या कुटुंबीयांनी (Ketan Agarwal death case) पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. केतनच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी आणि हा खटला जलद गतीने पूर्ण व्हावा, यासाठी कुटुंबीयांनी बाप्पाला साकडं घातलं व नवस बोलला. या संपूर्ण प्रकरणात सर्वात आधी केतनच्या बहिणीलाच मुख्य आरोपी सिया गोयल हिच्यावर संशय आला होता. तर केतन अग्रवालच्या (Ketan Agarwal death case)कुटुंबीयांनी आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि केतनच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी नवस बोलला. केतनच्या हत्येचा खटला लवकर पूर्ण व्हावा यासाठी साकडं घातलं.(Ketan Agarwal death case)

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण: केतन अग्रवालच्या बहिणीची प्रतिक्रिया

‘आज माझ्या भावाला एक महिना पूर्ण झाला आहे. एक महिना झाला, मी त्याला पाहिलं नाही. त्याचा आवाज ऐकला नाही आणि त्याचं हसू मला ऐकायला आलं नाही.. माझी फक्त गणपती बाप्पाकडे एकच प्रार्थना आहे की, माझ्या भावाला लवकरत लवकर न्याय मिळायला हवा आणि तो आता जिथे कुठे आहे, तिथे शांतीने जगू शकेल. त्याने आनंदी राहवं एवढीच इच्छा आहे. आज माझ्या आजोबांचा वाढदिवस आहे आणि भावाच्या मृत्यूला देखील एक महिना झाला आहे. हे दुःख आमच्या कुटुंबासाठी फार मोठं आहे.’(Ketan Agarwal death case)

सिया हिच्यावर संशय कसा आला? असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता ती म्हणाली, ‘या सर्व गोष्टींचा खुलासा ट्रायलमध्ये होईल, आता आम्ही गणराया चरणी फक्त एवढीच प्रार्थना करत आहोत की, केतन याला न्याय लवकरात लवकर मिळायला हवा असं तिने म्हटलं आहे.’(Ketan Agarwal death case)

Ketan Agarwal Death Case:  केतन अग्रवालच्या वडिलांची प्रतिक्रिया

हे प्रकरण सध्या फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जात आहे. दरम्यान, आरोपी सिया हिच्या पालकांकडून न्यायालयात सतत वकील बदलले जात असल्याची माहिती समोर येत आहे. यावर केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले ‘जे माझ्या मुलासोबत झालं आहे, असं कोणाच्याच मुलासोबत नाही झालं पाहिजे… न्यायव्यवस्थेकडे माझी एकच मागणी आहे आणि ती म्हणजे, आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी. ही शिक्षा लवकरात लवकर मिळावी. मी पंतप्रधानांना पत्र लिहून एवढीच मागणी केली आहे की, लवकरात लवकर आणि कठोर शिक्षा मिळाली पाहिजे.’(Ketan Agarwal death case)

Ketan Agrawal news: केतन अग्रवालच्या हत्येनंतरचा घटनाक्रम

– 18 जून केतन अगरवाल पाय घसरुन दरीत पडल्याचा बनाव
– दरीतून मृतदेह बाहे काढणाऱ्या शिवदुर्ग रेस्क्यू टीमकडे ‘अशी’ घटना घडेल का? पोलिसांची विचारणा आणि पहिला संशय
– सर्व विधी पार पडल्यावर 21 जूनला कुटुंबीय लोहगडावर पोहचले. केतनचा पडून मृत्यू झाला नसल्याचा पोलिसांकडे दावा
– मग सिया सांत्वनासाठी केतनच्या घरी आली, तेंव्हा केतनची बहीण संजनाने सियावर प्रश्नांची सरबत्ती केली.
– लोहगडावर तुम्ही काय-काय केलं? कुठं-कुठं फोटो काढले? फोटो काढताना पाय नेमका कसा घसरला? तेंव्हा तू खरंच फोटो काढत होतीस का? असे एकणानेक प्रश्न विचारताचं ती अनुत्तरित झाली
– बहीण संजनाच्या प्रश्नांनी सियावर संशय वाढला.
– वडील आणि बहिणींनी उपस्थिती केलेली शंका, दिलेले जबाब यातून तपासाची चक्र वेगाने हलली.
– जबाबात चेतन चौधरीचं नाव आलं. सिया आणि चेतनचे सिडीआर तपासण्यात आले.
– सिया आणि चेतनमध्ये गेल्या वर्षभरात 2004 वेळा फोन कॉल झाल्याचं आणि तीनशेहुन अधिक तास संवाद झाल्याचं उघड
– पण 18 जूनला तेजसचं लोकेशन लोहगडावर आढळलं नाही.
– एक तरुण भर उन्हात हुडी, हेडफोन आणि मास्क घालून लोहगडाच्या सीसीटीव्हीत आढळला.
– तोचं तरुण पुढं जाऊन सियाला काहीतरी खुनवत असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं.
– हा तरुण चेतन असेल तर मग फोन लोकेशन मार्केटयार्ड का दाखवतोय? मग पोलिसांची 18 जूनला चेतनच्या फोनवर आलेल्या व्यक्तींकडे विचारणा.
– चेतनचा फोन दुकानातील कामगारने उचलल्याचे आणि कामगाराचा फोन घेऊन चेतन लोहगडावर आल्याचं स्पष्ट
– 22 जूनच्या रात्री पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तेजसला ताब्यात घेतलं.
– तेजसला पोलिसी खाक्या दाखवताच सियाचं ही बिंग फुटलं.

हेदेखील वाचा

Comments are closed.