केतन अग्रवाल हत्या प्रकरण; सिया अन् चेतनची पोलीस कोठडीची मागणी फेटाळली, कोर्टात नेमकं काय काय घ

केतन अग्रवाल सिया गोयल लोहगड प्रकरण पुणे : केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणात सिया गोयल (Siya Goyal) आणि चेतन चौधरीची (Chetan Choudhari) पोलीस कोठडी संपली. त्यामुळं आज या दोघांना वडगाव मावळ न्यायालयात दुपारी हजर करण्यात आलं. न्यायाधीश ए.एम. विभूतेंच्या समोर ही सुनावणी पार पडली. आज न्यायालयात हजर करण्यापूर्वी गेल्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत कसून तपास करण्यात आला, यात पोलिसांच्या हाती लागलेले महत्वाचे धागेदोरे न्यायालयात सादर केले. यावेळी पोलिसांनी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती, मात्र न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पोलिसांची मागणी फेटाळून लावत आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद… कोर्टात नेमकं काय काय घडलं? (Ketan Agarwal Siya Goyal Lohagad Case Pune)

गेल्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत तपास यंत्रणांनी अनेक महत्त्वाचे पुरावे गोळा केल्याचा दावा न्यायालयात करण्यात आला. घटनास्थळाचा पंचनामा, आरोपींनी सराव केल्याचे सांगितल्या जाणाऱ्या ठिकाणाचा पंचनामा, फाडून टाकलेल्या पासपोर्टशी संबंधित ठिकाणाचा पंचनामा, आरोपींचे कपडे जप्त करणे आणि मोबाईलमधील डिलीट डेटा रिकव्हर करणे अशी तपासाची माहिती न्यायालयासमोर मांडण्यात आली.

तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपींच्या मोबाईलमधील डेटा मिळाला असून त्याची समोरासमोर पडताळणी करणे आवश्यक आहे. रिकव्हर करण्यात आलेल्या डेटामध्ये सांकेतिक भाषा आणि निकनेमचा वापर करून संवाद झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या संभाषणांचा नेमका अर्थ, तसेच या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास करणे बाकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना आरोपींसमोर बसवून चौकशी करणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद करत आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली.

सरकारी वकील डावपेच (केतन अग्रवाल सिया गोयल लोहगड केस पुणे)

सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, सिया गोयलचा दुसरा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. त्यामधील डिलीट डेटा रिकव्हर करण्यात आला असून त्यातील भाषा आणि निकनेमची पडताळणी करण्यासाठी आरोपींची समोरासमोर चौकशी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पोलीस कोठडी देणे गरजेचे असल्याचा आग्रह त्यांनी धरला.

बचाव पक्षाने काय केले? (केतन अग्रवाल सिया गोयल लोहगड प्रकरण पुणे)

सिया गोयलचे वकील विपुल दूशिंग यांनी न्यायालयात सांगितले की, सिया तपासात पूर्ण सहकार्य करत आहे. पोलिसांनी ज्या मोबाईलचा उल्लेख केला, तो आधीच जप्त करण्यात आला आहे. केवळ मोबाईलमधील संदेशांचा अर्थ लावण्यासाठी किंवा सांकेतिक चिन्हांची पडताळणी करण्यासाठी पोलीस कोठडी मागणे कायदेशीरदृष्ट्या योग्य नसल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. त्यामुळे पोलीस कोठडी नाकारावी, अशी मागणी बचाव पक्षाने केली. तर दुसऱ्या बाजूने केतन अग्रवाल यांच्या वकिलांनीही पोलिसांकडे केवळ शक्यता आणि संशय असल्याचे सांगितले. ठोस कारणांशिवाय आरोपींना पुन्हा पोलीस कोठडीत ठेवणे योग्य नसल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

नार्को टेस्टबाबत न्यायालयाची टिप्पणी, नेमकं काय म्हणाले? (Ketan Agarwal Siya Goyal Lohagad Case Pune)

सुनावणीदरम्यान नार्को टेस्टचाही मुद्दा उपस्थित झाला. यावेळी न्यायाधीशांनी स्पष्ट केले की, नार्को विश्लेषण चाचणीसाठी आरोपींची संमती आवश्यक असते. त्यांच्या संमतीशिवाय अशा चाचणीला परवानगी देता येणार नाही. त्यावर सरकारी वकिलांनी सध्या नार्को टेस्टची गरज नसल्याचे न्यायालयाला सांगितले. दोन्ही बाजूंचा सविस्तर युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पोलिसांची आणखी तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावली. त्यानंतर सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश देण्यात आले.

Comments are closed.