तुकाराम मुंढेंनी स्टिंगसह 3 कंपन्यांची नावे घेतली, नोटीसही बजावली; ‘एनर्जी ड्रिंक लिहायचं नाही

मुंबई : राज्य विधिमंडळ सभागृहात आज स्टिंग या एनर्जी ड्रिंकचा (Sting) मुद्दा चांगलाच गाजला. भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी यासंदर्भातील प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावर, उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. शाळा परिसरात 500 मीटरच्या आता स्टिंग हे ड्रिंक विक्रीस उपलब्ध करुन देता कामा नये, असे म्हटले. त्यानंतर, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव तुकाराम मुंढे (Tukaram mundhe) यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यात सुरू असलेल्या सेव्ह ड्रग, सेव्ह फूड मोहिमेची माहिती दिली. तसेच, पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना स्टिंगबाबतही उत्तर दिले.

बाजारात जे काही सोल कॉल्ड एनर्जी डिंक्स म्हणून येतात, या सो कॉल्ड एनर्जी ड्रिंक्सच्या कंपन्यांना एनर्जी ड्रिंक्स हा शब्द लिहता येत नाही, 30 जून रोजी याबाबत त्यांना नोटीस काढण्यात आल्या आहेत. 10-12 कंपन्या आहेत, पेप्सिको, रेड बुल, स्टिंगसारख्या कंपन्या ज्या कंपन्या आहेत, त्यांना फिसच्या नियमावलीनुसार संबंधित कंपन्यांना तो शब्द लिहता येत नाही. त्यामुळे, संबंधित कंपन्यांना एनर्जी ड्रिंक असं आपल्या उत्पादनावर लिहता येणार नाही हे नोटीसमध्ये बजावले आहे. त्यामुळे, आता ते बंद होईल, असे तुकाराम मुंढेंनी स्पष्टपणे सांगितले.

शाळेच्या मुख्याध्यापकांनी आम्हाला कळवावे – मुंढे

शाळा परिसरात, 500 मीटर परिसरात कुठल्या पदार्थांना, शीतपेयांना विक्री आहे, याचे नियम आहेत. आता, या नियमांची अंलबजावणी करण्याची जबाबदारी एफडीए आयुक्त म्हणून माझी आहे. तसेच, दुसरीकडे शाळेतील मुख्याध्यापकांचीही आहे, आपल्या शाळा परिसरात 500 मीटरच्या आत जर अशा प्रकारचे ड्रिंक्स विकले जात असेल तर आमच्या विभागाला कळवावे, लवकरच याबाबत मी सविस्तर आदेश पारीत करत आहे, असेही तुकाराम मुंढेंनी स्पष्ट केले.

हेही वाचा

आता दूध सम्राटांना तुकाराम मुंढेंची वॉर्निंग; राज्यात ‘सेव्ह फूड सेव्ह ड्रग’ मोहीम, फार्म टू प्लेटसाठी नियमावली जारी

Comments are closed.