सिया गोयलचे फक्त चेतनशी नव्हे तर इतर मुलांशी अश्लील चॅटिंग, अनैतिक संबंध? केतन अग्रवालच्या वडिल
केतन अग्रवाल प्रकरण: सध्या राज्यासह देशात चर्चेचा विषय ठरलेल्या पुण्याच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर (Lohagad Fort) व्यावसायिक केतन अग्रवाल (Ketan Agarwal) याची दरीत ढकलून हत्या केल्याच संतापजनक प्रकरण घडलं. या प्रकरणात आता अत्यंत नाट्यमय आणि महत्त्वाचं वळण मिळालं आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणाऱ्या पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेला (Pune Rural Police Crime Branch) या गुन्ह्यात धक्कादायक माहिती हाती लागली आहे. तपासादरम्यान सिया गोयल (Siya Goyal) आणि हत्याकांडात सामील असलेला तिचा मित्र चेतन चौधरी (Chetan Chaudhary) यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले आहे. मागच्या केवळ साडेपाच महिन्यात तब्बल 2004 फोन कॉल आणि 238 तास गप्पा झाल्याच्या माहिती समोर आली आहे. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची शक्यता वर्तवली जात असतानाच आता केतनच्या कुटुंबीयांनी काही गंभीर आरोप केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सियाला हे लग्न करायचेच नव्हते. शिवाय तिचे चेतनसोबत (Chetan Chaudhary) संबंध होते. यासह तिचं इतर अनेक मुलांसोबत अश्लील संभाषण आणि संबंध असल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.
Ketan Agrawal Crime Case : जयपुरमध्ये 17 कोटींचं संपूर्ण हॉटेल बुक करून लग्नाची जोरदार तयारी, पण…
केतनला ट्रेकिंगची प्रचंड आवड होती , तो एक अनुभवी ट्रेकर होता. त्यामुळे तो पाय घसरून पडेल यावर कुणीही विश्वास करणार नाही. धक्कादायक बाब म्हणजे यापूर्वीही सियाने केतनला तीन ते चारवेळा लोहगडावर ट्रेकिंगसाठी नेलं होतं. 14 जूनला देखील त्याला ढकलण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. तपासादरम्यान पोलिसांनी किल्ल्याच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासले आहेत. यात चेतन चौधरी संशयास्पद हालचाली करताना आढळून आला आहे. चेहरा लपवून तो परिसरात फिरत होता. सोबतच तो केतन आणि सियावर लक्ष ठेवून होता, असे देखील बोलले जात आहे. मोबाईल डेटा, कॉल रेकॉर्ड आणि इतर टेक्निकल पुरावे यांच्या तपासाच्या आधाराव सिया आणि चेतनला अटक केली आहे. नोव्हेंबरमध्ये सिया आणि केतनच लग्न होणार होतं. त्यासाठी चेतनने केतनने हॉटेल देखील बुक केलं होतं. जयपुरमध्ये 17 कोटींचं संपूर्ण हॉटेल बुक करून लग्नाची जोरदार तयारी सुरू करण्यात आली होती. पण ज्या मुलीसोबत आयुष्य काढायचं होतं त्याच मुलीने केतनचा काटा काढल्याचा आरोप आहे. दरम्यान या प्रकरणाचा सध्या तपास सुरू असून त्यातून आणखी काही नवे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Vishal Aggarwal : ज्या वडिलांचा 26 वर्षांचा मुलगा जगातून निघून गेला, त्याचं दुःख समुद्रा एवढं
मी माझं दुःख तुम्हाला कोणत्या शब्दात सांगू. ज्या वडिलांचा 26 वर्षांचा मुलगा जगातून निघून गेला तर त्याच दुःख समुद्रा एवढं आहे. माझ्या शेवटच्या क्षणाचा तोच आधार होता. आज तोच निघून गेलाय तर मी उध्वस्थ झालो आहे. केतन आभ्यासात अतिशय हुशार होता, सोबतच तो व्यवसायायात देखील उत्तम काम करत होता. माझ्यासाठी तर तो कोहिनुर होता. यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी. अशी आर्त हाक केतनच्या वडिलांनी सरकारकडे केली आहे.
Ketan Agrawal news: केतन अगरवालच्या हत्येनंतरचा घटनाक्रम
– 18 जून केतन अगरवाल पाय घसरुन दरीत पडल्याचा बनाव
– दरीतून मृतदेह बाहे काढणाऱ्या शिवदुर्ग रेस्क्यू टीमकडे ‘अशी’ घटना घडेल का? पोलिसांची विचारणा आणि पहिला संशय
– सर्व विधी पार पडल्यावर 21 जूनला कुटुंबीय लोहगडावर पोहचले. केतनचा पडून मृत्यू झाला नसल्याचा पोलिसांकडे दावा
– मग सिया सांत्वनासाठी केतनच्या घरी आली, तेंव्हा केतनची बहीण संजनाने सियावर प्रश्नांची सरबत्ती केली.
– लोहगडावर तुम्ही काय-काय केलं? कुठं-कुठं फोटो काढले? फोटो काढताना पाय नेमका कसा घसरला? तेंव्हा तू खरंच फोटो काढत होतीस का? असे एकणानेक प्रश्न विचारताचं ती अनुत्तरित झाली
– बहीण संजनाच्या प्रश्नांनी सियावर संशय वाढला.
– वडील आणि बहिणींनी उपस्थिती केलेली शंका, दिलेले जबाब यातून तपासाची चक्र वेगाने हलली.
– जबाबात चेतन चौधरीचं नाव आलं. सिया आणि चेतनचे सिडीआर तपासण्यात आले.
– सिया आणि चेतनमध्ये गेल्या वर्षभरात 2004 वेळा फोन कॉल झाल्याचं आणि तीनशेहुन अधिक तास संवाद झाल्याचं उघड
– पण 18 जूनला तेजसचं लोकेशन लोहगडावर आढळलं नाही.
– एक तरुण भर उन्हात हुडी, हेडफोन आणि मास्क घालून लोहगडाच्या सीसीटीव्हीत आढळला.
– तोचं तरुण पुढं जाऊन सियाला काहीतरी खुनवत असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं.
– हा तरुण चेतन असेल तर मग फोन लोकेशन मार्केटयार्ड का दाखवतोय? मग पोलिसांची 18 जूनला चेतनच्या फोनवर आलेल्या व्यक्तींकडे विचारणा.
– चेतनचा फोन दुकानातील कामगारने उचलल्याचे आणि कामगाराचा फोन घेऊन चेतन लोहगडावर आल्याचं स्पष्ट
– 22 जूनच्या रात्री पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तेजसला ताब्यात घेतलं.
– तेजसला पोलिसी खाक्या दाखवताच सियाचं ही बिंग फुटलं.
आणखी वाचा
Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?
Comments are closed.