केतन अग्रवालला लोहगडावरुन ढकलण्याआधी सियाने गुगलवर काय सर्च केलं?; हादरवणारी माहिती
केतन अग्रवाल पुणे लोहगड मृत्यू प्रकरण: पुण्याच्या लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलेल्या केतन अग्रवालचा (Ketan Agrawal Pune Lohagad Death Case) पाय घसरून दरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना 18 जून रोजी घडली होती. सुरुवातीला हा निव्वळ एक अपघात वाटत असतानाच, आता पुणे पोलिसांच्या तपासात एक अत्यंत खळबळजनक आणि थरारक खुलासा झाला आहे. हा अपघात नसून, होणाऱ्या पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने रचलेला हा एक थंड डोक्याने केलेला ‘मर्डर प्लॅन’ असल्याचं निष्पन्न झालं आहे. लोहगड किल्ल्यावरून ढकलून केतन अग्रवाल (Ketan Agrawal) या तरुणाचा खून केल्याप्रकरणी होणारी पत्नी सिया गोयल (Siya Goyal) आणि तिचा मित्र चेतन चौधरी (Chetan Choudhari) 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सियाने हत्येचा कट गुगलवर सर्च केला- (Ketan Agrawal Pune Lohagad Death Case)
केतन अग्रवालच्या हत्येचा कट सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीने रचला. लोहगडावरुन ढकलण्याआधी सियाने केतनच्या हत्येचा कट गुगलवर सर्च करुन शिजवला, अशी माहिती सूत्रांनी दिली. तिच्या मोबाईलमध्ये त्या अनुषंगाने काही पुरावे आढळले आहेत. गुगलवरुन घेतलेल्या माहितीच्या आधारे केतनची हत्या केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढलाय, असं ही सूत्रांनी सांगितले. दरम्यान, घटनेला पूर्णत्वास आणण्यापूर्वी चेतन आणि सिया एका कॅफेमध्ये भेटले आणि केतन अग्रवाल याला कसं मारायचं याचा प्लॅन बनवला. लोहगडावर कुठला पॉईंटवरुन केतनला ढकलले जाऊ शकते याचा प्लॅन दोघांनी आखला.
कोण आहे केतन अग्रवाल? (Who Is Ketan Agrawal)
- पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा
- 25 वर्षीय केतन सिम्बॉयसिसमधून BBA चं शिक्षण घेतलं तर उच्चपदवी (MS) यूएसमधून घेतली.
- दोन वर्षांपूर्वी शिक्षण पूर्ण करुन तो भारतात आला आणि वडिलांच्या बांधकाम व्यवसायात उतरला.
- गेल्या वर्षी स्वतः एक बांधकाम साईट्सची निर्मिती करायला सुरुवात केली.
- फेब्रुवारी महिन्यात सिया सोबत साखरपुडा
- नोव्हेंबर महिन्यात भोवल्यावर चढण्यापूर्वी सिया आणि प्रियकर चेतनने हत्या केली.
कोण आहे सिया गोयल? (Who Is Siya Goyal)
- पुण्यातील व्यावसायिक प्रवीण गोयल यांची कन्या
- 20 वर्षीय सिया बी-कॉम शिक्षण ही घेत आहे.
- गोयल कुटुंबीयांचा ड्राय फ्रुटस-मसालेचा व्यवसाय
- सियाला मात्र मार्केटयार्ड परिसरात केक विक्रीची बेकरी टाकून देण्यात आली.
कोण आहे चेतन चौधरी? (Who Is Chetan Choudhari)
- पुण्यातील व्यावसायिक बाबूलाल चौधरी यांचा मुलगा
- 23 वर्षीय चेतनने बीबीएचं शिक्षण घेतलंय.
- दोन वर्षांपासून मार्केटयार्ड येथील वडिलांचा ड्राय फ्रुट्स-किराणा ट्रेडर्स व्यवसाय तो पाहतो.
- तो एक उत्तम क्रिकेटर सुद्धा आहे, रणजी क्रिकेट खेळण्याचं त्याचं स्वप्न आहे.
केतन अगरवालच्या हत्येनंतरचा घटनाक्रम- (Ketan Agrawal Pune Lohagad Death Case)
– 18 जून केतन अगरवाल पाय घसरुन दरीत पडल्याचा बनाव
– दरीतून मृतदेह बाहे काढणाऱ्या शिवदुर्ग रेस्क्यू टीमकडे ‘अशी’ घटना घडेल का? पोलिसांची विचारणा आणि पहिला संशय
– सर्व विधी पार पडल्यावर 21 जूनला कुटुंबीय लोहगडावर पोहचले. केतनचा पडून मृत्यू झाला नसल्याचा पोलिसांकडे दावा
– मग सिया सांत्वनासाठी केतनच्या घरी आली, तेंव्हा केतनची बहीण संजनाने सियावर प्रश्नांची सरबत्ती केली.
– लोहगडावर तुम्ही काय-काय केलं? कुठं-कुठं फोटो काढले? फोटो काढताना पाय नेमका कसा घसरला? तेंव्हा तू खरंच फोटो काढत होतीस का? असे एकणानेक प्रश्न विचारताचं ती अनुत्तरित झाली
– बहीण संजनाच्या प्रश्नांनी सियावर संशय वाढला.
– वडील आणि बहिणींनी उपस्थिती केलेली शंका, दिलेले जबाब यातून तपासाची चक्र वेगाने हलली.
– जबाबात चेतन चौधरीचं नाव आलं. सिया आणि चेतनचे सिडीआर तपासण्यात आले.
– सिया आणि चेतनमध्ये गेल्या वर्षभरात 2004 वेळा फोन कॉल झाल्याचं आणि तीनशेहुन अधिक तास संवाद झाल्याचं उघड
– पण 18 जूनला तेजसचं लोकेशन लोहगडावर आढळलं नाही.
– एक तरुण भर उन्हात हुडी, हेडफोन आणि मास्क घालून लोहगडाच्या सीसीटीव्हीत आढळला.
– तोचं तरुण पुढं जाऊन सियाला काहीतरी खुनवत असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं.
– हा तरुण चेतन असेल तर मग फोन लोकेशन मार्केटयार्ड का दाखवतोय? मग पोलिसांची 18 जूनला चेतनच्या फोनवर आलेल्या व्यक्तींकडे विचारणा.
– चेतनचा फोन दुकानातील कामगारने उचलल्याचे आणि कामगाराचा फोन घेऊन चेतन लोहगडावर आल्याचं स्पष्ट
– 22 जूनच्या रात्री पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तेजसला ताब्यात घेतलं.
– तेजसला पोलिसी खाक्या दाखवताच सियाचं ही बिंग फुटलं.
नेमकं प्रकरण काय? (Ketan Agrawal Pune Lohagad Death Case)
बालीचा बेत फसल्यानंतर, 14 जून रोजी सुद्धा सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर नेले होते. मात्र, त्या दिवशी परिस्थिती अनुकूल न मिळाल्यामुळे किंवा धाडस न झाल्यामुळे त्यांचा कट पूर्ण होऊ शकला नाही. 19 जून रोजी दोघांच्या कुटुंबीयांनी मिळून सियाचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले होते. मात्र सियाने केतनकडे 18 जून रोजीच लोहगडला ट्रेकिंगसाठी जाण्याचा आग्रह धरला. ठरलेल्या कटानुसार, तिचा प्रियकर चेतन चौधरी हा आधीच लोहगड किल्ल्यावर पोहोचला होता. केतन पुढे असताना चेतन पाठीमागून आला आणि त्या दोघांनी मिळून केतनला खोल दरीत ढकलून दिले, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
संबंधित बातमी:
Crime Patrol Style Theft Special Report : ‘क्राईम पेट्रोल’ पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Comments are closed.