PI सचिन हिरेंनी जाणिवपूर्वक दुर्लक्ष केलं, खोपोली हत्या प्रकरणात काळोखे कुटुंबीयांचा आरोप

रायगड : खोपोलीमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेळ काळोखे (मंगेश काळोखे हत्या) यांची निर्घुण हत्या करण्यात आली. खोपोलीचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्याकडे मंगेळ काळोखे यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार देऊनही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप काळोखे कुटुंबीयांनी केला. पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

मंगेश काळोखे यांनी या आधी खोपोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार त्यांनी केली होती. आरोपी रवींद्र देवकर आणि त्याचे साथिदार संशयितरित्या हत्यारे घेवून फिरत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मंगेळ काळोखे यांनी केली होती. परंतु, पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्याचमुळे ही हत्या झाल्याचा आरोप काळोखे कुटुंबीयांनी केला.

मंगेश काळोखे खून प्रकरण: जीवाला धोका असल्याची तक्रार

मयत मंगेश काळोखे यांनी खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांना तक्रार देवूनही दखल न घेतल्याने त्यांच्या हत्येस सचिन हिरे जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांना निलंबीत करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मंगेश काळोखे यांचे आतेभाऊ संदेश पाटील यांनी केली.

मंगेश काळोखे यांच्या आरोपींना अटक करावी, पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांना निलंबित करावं यासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी खोपोली पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी प्रयत्न केला असता पोलीस आणि जमावामध्ये धक्काबुक्की झाली.

खोपोली हत्याकांड : नेमकं काय घडलं?

खोपोली नगरपालिकेच्या शिंदे सेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची शुक्रवारी सकाळी वाजता निर्घुण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. यावेळी घटनास्थळाजवळ असलेल्या काही नागरिकांनी हल्लेखोरांना पाहिले असता ते हल्लेखोर काळया रंगाच्या वाहनातून आल्याची माहिती समोर आली. मात्र हे आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

खोपोली पोलीस या हल्लेखोरांचा शोध घेत असून मंगेश काळोखे यांच्या हत्येमागे नक्की कोणाचा हात आहे याबाबतीत पोलीस अधिक माहिती घेत आहेत. दरम्यान याप्रकऱणी राष्ट्रवादीच्या एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bharat Gogawale On पुनर्रचना हत्या: भरत गोगावलेंचा आरोप

निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्याने ही हत्या झाली असावी, यामागे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी केला.

सुधाकर घारे रायगड : सुधाकर घारेंनी आरोप फेटाळला

दरम्यान, राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, खोलीतील हत्या प्रकरणात आपला कोणताच हात नसून स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्यावर जाणूनबुजून आरोप केले आहेत. या घटनेमुळे आपल्याला दुःख झालं असून आपण यावर स्वतः समोर येऊन खुलासा करणार आहोत.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.