रामदास स्वामी शिवरायांचे गुरू, बाबासाहेबांवर मनाच्या श्लोकचा प्रभाव, किशोरी पेडणेकर काय म्हणाल्

मुंबई : राजधानी मुंबईतील महापालिकेच्या शाळांमध्ये (School) मनाचे श्लोक सक्तीचे करण्याचा प्रस्ताव शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका आणि गटनेत्या किशोरी पेडणेकर (Kishori pednekar) यांनी दिला आहे. किशोरी पेडणेकरांच्या या प्रस्तावाचे मनसेनं स्वागत केलं आहे. मात्र, एमआयएमने या प्रस्तावास विरोध दर्शवल्याने आता वेगळाच वाद निर्माण झाला आहे. त्यातच, मनाचे श्लोक संदर्भाने माहिती देताना किशोरी पेडणेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उदाहरण दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बालपणी त्यांच्यावर मनाचे श्लोकचा परिणाम होता, असेही पेडणेकर यांनी म्हटलं.

महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. रामदास स्वामी हे त्यांचे गुरू, यंत्र मंत्र साधू-संत त्यांच्या आशीर्वादाला आपण महत्व देतो. अलीकडच्या पिढीच्या हातात मोबाईल आल्यामुळे त्यांच्या विचारात परिवर्तन झालं पाहिजे. मनाचे श्लोक हे रामदास स्वामी समर्थ्यांच्या लिखित श्लोक आहेत. एमआयएमने कुठंतरी याला विरोध केलं आहे, त्याला विरोध करायची गरज नाही, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं. शाळांमध्ये मुलांवर जसे संस्कार कराल तशी मुलं घडतील, अशा मुलांच्या मनावर खऱ्या अर्थाने जाती, धर्म, पंथ आणि संस्कार म्हणून फक्त हिंदूचे नाहीत. तर, हे सामाजिक संस्कार आहेत, असेही पेडणेकर यांनी म्हटलं.

बाबासाहेबांवरही मनाचे श्लोकचा प्रभाव

आम्हाला शाळेत मनाचे श्लोक शिकवले जायचे, आमच्यात मनाचे श्लोक म्हणण्यावर स्पर्धा व्हायची. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण लहानपण पाहिलं तर त्यांच्यावर देखील मनाच्या श्लोकांचा परिणाम दिसतो. डॉ. बाबासाहेब यांनी देशाला संविधान दिलं, मनाच्या श्लोकचा प्रभाव बाबासाहेब यांच्यावरही बालपणी दिसला. म्हणूनच, चांगला नागरिक घडवण्यासाठी त्यांनी चांगलं संविधान दिलं, जे संविधान अधिकार दाखवतात. मला इतिहास बदलायचा नाही, आमच्या मनावर त्याचा पगडा बसला आहे, असे म्हणत मनाचे श्लोक बालपणापासूनच शाळेत शिकवले जावेत, यावर पेडणेकर यांनी भर दिला.

मुंबईत जेवढ्या शाळा असतील, खासगी, अनुदानित, महापालिकांच्याही शाळा आहेत, त्यांनी हा अभ्यासक्रम घ्यावा. कॉन्व्हेंट शाळांबद्दल काल कोर्टाने निकाल दिला आहे. सर्व शाळांमध्ये सर्वधर्मीय मुलं शिकतात. आम्ही हिंदू आहोतच, मात्र आजूबाजूला जी मुलं असतात त्यांना सर्वांना हे शिक्षण दिलं गेलं पाहिजे. आमच्या महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीचं आहे, त्यात विचार चांगले होतील आणि देशाचा आदर्श नागरिक घडवेल, असेही पेडणेकर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

मनसेचा पाठिंबा, एमआयएमला टोला

शाळेत मनाचे श्लोक सक्तीचे करत असतील गैर काय? आमच्यावेळी सुद्धा मनाचे श्लोक पाठ करून घ्यायचे. उच्चारामध्ये स्पष्टता यावी यासाठी ही श्लोक आहेत. त्यामुळे, एमआयएमने सुद्धा ब्रॉड पद्धतीने हा विषय घ्यायला हवं होता. संस्कार आणि भाषा उच्चार सुधारण याचा विचार करायला हवा होता आणि पाठिंबा द्यायला हवा होता, अशी प्रतिक्रिया मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी दिलीय.

हेही वाचा

शरद पवार निवडणूक लढणार नाहीत, पण…; बारामती, राहुरीच्या पोटनिवडणुकीवर संजय राऊतांचं मोठं विधान

आणखी वाचा

Comments are closed.