देसाई रुग्णालयातील बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल करा! विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांची मागणी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महापालिकेच्या व्ही.एन. देसाई रुग्णालयात बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे. संबंधित व्यक्तीकडे महाराष्ट्र मेडिकल काwन्सिलची वैध नोंदणी नसतानाही तिला रुग्णालयात कामावर कसे ठेवले, असा सवाल करत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पेडणेकर यांनी केली आहे.

महापालिका रुग्णालयांत डॉक्टर्स, नर्स आणि सुरक्षा रक्षकांची कमतरता असल्याने कंत्राटी पद्धतीने भरती केली जाते. मात्र, कंत्राटदारांकडून अर्हता न तपासताच भरती केली जात असल्याने रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप पेडणेकर यांनी केला आहे. या आरोपानंतर पालिका प्रशासनाने सर्व कंत्राटी डॉक्टरांच्या पदव्या पुन्हा तपासण्याचे निर्देश दिले आहेत. यापुढे कंत्राटी भरती करताना अधिक सतर्कता बाळगण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

n अॅड. तुषार भोसले यांनी केलेल्या तक्रारीनंतर ‘जीवन ज्योती ट्रस्ट’ या संस्थेला 2023 मध्येच काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. मागील पाच वर्षांत बोगस डॉक्टरांविरुद्ध 35 एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांनी दिली.

Comments are closed.