धक्कादायक! भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, खाजगी सावकारीतून घटना घडल्याची माहिती, कोल्हापुरात खळबळ
कोल्हापूर क्राईम न्यूज : कोल्हापुरात धक्कादायक घटना घडली आहे. भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. सुरज साखरे असं या गोळीबारात जखमी झालेल्या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. जखमी झालेले भाजप कार्यकर्ते सुरज साखरे यांना तातडीन रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे. नवीन वाशी नाका परिसरात हा गोळीबार झाल्याची माहिती देखील मिळाली आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, खाजगी सावकारीतून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सुरज साखरे याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. कोल्हापुरात नवीन वाशी नाका परिसरात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार दोघांनी गोळीबार केला आहे. दरम्यान, कोल्हापूर शहरात गोळीबाराची घटना घडल्यामुळं मोठी खळबळ उडाली आहे.
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Comments are closed.