कोंढव्यात एटीएस अन् पुणे पोलिसांचं सर्च ऑपरेशन; गल्लीबोळामध्ये झळकले आय लव मोहम्मदचे बॅनर, चौकश


पुणे: कोंढव्यामध्ये (Pune’s Kondhwa area) एकीकडे तपास यंत्रणांची छापेमारी (search operation) सुरू असतानाच दुसरीकडे कोंढव्यामध्ये काही ठिकाणी आय लव्ह मोहम्मदचे बॅनर्स झळकताना दिसत आहेत. त्यामुळे या छापेमारीचा (search operation) या सगळ्या बॅनरबाजीशी काही संबंध आहे का? हे पाहणं महत्वाचं ठरेल, पोलिस या दिशेने तपास करण्याची शक्यता आहे. पुण्यातील कोंढवा भागामध्ये तपास यंत्रणांची छापेमारी (search operation) सुरू केली आहे. आज मध्यरात्रीपासूनच या छापेमारीला सुरूवात झाली आहे. कोंढवा परिसरामध्ये छापेमारी सुरू असतानाच गल्लीबोळामध्ये आय लव मोहम्मदचे बॅनर झळकले आहेत, त्यामुळे छापे आणि बॅनर यांचा काही संबंध आहे का? याचाही तपास सुरू आहे, पोलीस त्या दृष्टिकोनातूनही तपास करत आहेत. (Pune’s Kondhwa area search operation)

search operation: गल्लीबोळामध्ये आय लव मोहम्मदचे बॅनर

एकीकडे पुण्यातील कोंढवा भागामध्ये पुणे पोलीस आणि एटीएस यांची संयुक्त कारवाई सुरू आहे. कोंढवा भागात अनेक ठिकाणी छापेमारी सुरू आहे. पोलीस रस्त्यात गल्लोगल्ली फिरताना दिसत आहेत, काही लोकांना एटीएसने ताब्यात घेतलं आहे, त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे, तर दुसरीकडे याच गल्लीबोळामध्ये आय लव मोहम्मदचे बॅनर झळकताना दिसत आहेत. परिसरात पोलीस फिरत आहेत, त्याच रस्त्यांवरती दोन ते तीन ठिकाणी आय लव मोहम्मदचे बॅनर लावल्याचे निदर्शनास येत आहे.

ही कारवाई आणि हे बॅनर यांचा आपापसात काही संबंध आहे का? असा सवाल देखील उपस्थित होत आहे, तसा संशय देखील व्यक्त केला जात आहे, जवळपास हजार पोलीस अधिकारी कर्मचारी कोंढवा परिसरात तैनात आहेत. जवळपास 25 ठिकाणी हे कारवाई सुरू आहे, दुसऱ्या बाजूला हे बॅनर पाहून यामुळेच ही कारवाई सुरू असावी असा संशय व्यक्त केला जातो, याच परिसरापासून काही अंतरावर असलेल्या एका सोसायटीमध्ये दोन वर्षांपूर्वी दहशतवादी राहत होते, कारवाईमध्ये ते आढळून आले होते, ती जागा सील करण्यात आली होती, त्या ठिकाणी देखील पुणे पोलिसांचे आणि एटीएस ची छापीमारी सुरू आहे.

search operation: 18 ठिकाणी मोठं सर्च ऑपरेशन सुरू

मध्यरात्रीपासून तब्बल 18 ठिकाणी मोठं सर्च ऑपरेशन सुरू आहे. महाराष्ट्र पोलिस, पुणे पोलिस आणि केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा मिळून हे संयुक्त ऑपरेशन (search operation) राबवत आहेत. काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी दोन वर्षांपूर्वीच बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेच्या तीन सदस्यांना कोंढवा परिसरातून अटक केली होती. त्यानंतर देशातील संभाव्य दहशतवादी कट उधळण्यात यश आलं होतं. त्याच भागात आता पुन्हा काही संशयित तपास यंत्रणांच्या नजरेत आले आहेत.पोलिसांकडून इतकंच पुष्टी करण्यात आलं आहे की, हे संयुक्त सर्च ऑपरेशन असून त्यात महाराष्ट्र पोलिस, पुणे पोलिस आणि केंद्रातील सुरक्षा यंत्रणा एकत्रितपणे काम करत आहेत. शोधमोहीम पूर्ण झाल्यानंतर तपशील अधिकृतरीत्या जाहीर केला जाईल, असं पोलिस सूत्रांनी सांगितलं.

https://www.youtube.com/watch?v=vmpeheonq5e

आणखी वाचा

Comments are closed.