सलग 15 व्या वर्षी बारावीच्या परीक्षेत कोकण बोर्ड अव्वल, कोकण बोर्डाचा 94.14 टक्के निकाल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज संकेतस्थळावर जाहिर झाला.सलग पंधराव्या वर्षी कोकण बोर्डाने राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. कोकण बोर्डाचा निकाल 94.14 टक्के लागला आहे.त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा 93.18 टक्के आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 95.14टक्के निकाल लागला आहे.कोकण बोर्डात झालेल्या विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला.

कोकण बोर्डात बारावीच्या परीक्षेला 22 हजार 888 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यापैकी 21 हजार 548 विद्यार्थ्यी उत्तीर्ण झाले आहेत.कोकण बोर्डात 11 हजार 500 मुलगे परीक्षेला बसले त्यापैकी 10 हजार 526 उत्तीर्ण झाले.मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 91.53 टक्के आहे.11 हजार 388 मुली परीक्षेला बसल्या त्यापैकी 11 हजार 22 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 96.78 टक्के आहे.

रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल 93.18 टक्के लागला आहे. 14 हजार 915 विद्यार्थी परीक्षेला बसले त्यापैकी 13 हजार 898 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.रत्नागिरी जिल्ह्यात 7 हजार 397 मुलगे परीक्षेला बसले त्यापैकी 6 हजार 659 मुलगे उत्तीर्ण झाले आहेत.मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 90.52 टक्के आहे. 7 हजार 518 मुली परीक्षेला बसल्या. त्यापैकी 7 हजार 239 उत्तीर्ण झाल्या आहेत.मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 96.28 टक्के आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल 95.94 टक्के लागला आहे.जिल्ह्यात ७ हजार ९६३ विद्यार्थी परीक्षेला बसले त्यापैकी 7 हजार 650 उत्तीर्ण झाले आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4 हजार 103 मुले परीक्षेला बसले त्यापैकी 3 हजार 867 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 91.53 टक्के आहे. 3 हजार 870 मुली परीक्षेला बसल्या त्यापैकी 3 हजार 783 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 97.75 टक्के आहे.

दरम्यान कोकण बोर्डात बारावीच्या परीक्षेला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही कॉपीचा प्रकार आढळून आला नाही.परीक्षा केंद्रात सीसीटिव्हीची करडी नजर होती.तसेच भरारी पथकेही तैनात ठेवण्यात आली होती.

शाखा निहाय निकाल

१) विज्ञान- ९७.५३ टक्के

२) कला – ८८.६२ टक्के

३) वाणिज्य- ९३.९२ टक्के

४) व्यवसायिक अभ्यासक्रम- ९४.१३ टक्के

५) टेक्निकल सायन्स- ८६.८८ टक्के

Comments are closed.