काल बापाने कोर्टात एन्काऊंटरची भीती बोलून दाखवली अन् आज कृष्णा आंदेकर पोलिसांना शरण आला
पुणे: पुण्यातील नाना पेठ परिसरात झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंदेकर स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे. कृष्णा आंदेकर त्याच्यावर ज्या समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे, त्या असलेल्या समर्थ पोलीस ठाण्यात हजर झाला असल्याची माहिती समोर आली आहे. कृष्णा आंदेकर हा आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी आहे. आंदेकर टोळीचा प्रमुख कृष्णा आंदेकर याचा तो मुलगा आहे.
सकाळी कृष्णा आंदेकरला अटक केल्यानंतर त्याला आज न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. कृष्णा आंदेकर मागील अकरा दिवसांपासून कुठे होता? त्याला लपण्यासाठी कोणी मदत केली? त्याचा आयुष कोमकर हत्या प्रकरणात काय हात आहे? याचा सविस्तर तपास आता पुणे पोलीस करत आहेत. एकूणच आयुष कोमकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपी आता पोलिसांच्या अटकेत आहेत.
दरम्यान काल कृष्णा आंदेकर याची माहिती दे, नाहीतर त्याला थेट गोळ्या घालू, अशी धमकी दिल्याचा दावा बंडू आंदेकर याने सोमवारी न्यायालयात केला होता. त्यानंतर आज कृष्णा आंदेकर आज पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. इतके दिवस कृष्णा आंदेकर कुठे होता? तो कुठे लपून बसला होता? तो पोलिसांच्या हाती कसाकाय लागला नाही, अशा चर्चा होताना दिसत आहेत.
… नाहीतर कृष्णा आंदेकरला गोळ्या घालू; बंडू आंदेकरचा दावा
कृष्णा आंदेकर याची माहिती दे, नाहीतर त्याला थेट गोळ्या घालू, अशी धमकी दिल्याचा दावा बंडू आंदेकर याने सोमवारी न्यायालयात केला होता. तसेच इतर आरोपींना पोलिस कोठडीत बेदम मारहाण झाल्याच्या, जीवनावश्यक गरजा पूर्ण होत नसल्याची तक्रार केली. पोलिसांनी गेल्या आठवडाभरापासून आपल्याला अंघोळ करू दिली नाही, तसेच कपडेही बदलू देत नसल्याचा आरोप केला. त्यावर, न्यायाधीश साळुंखे यांनी आरोपी मेरगू याला कोठे मारहाण झाली? अशी विचारणा करून अंगावरील बळ दाखविण्यास सांगितले. याबाचत न्यायालयाने नाराजी व्यक्त करत आरोपीना आवश्यक त्या वस्तू पुरविण्याची सूचना तपास अधिकाव्यांना केली. आरोपींना चमकी दिल्याचा आणि मारहाण केल्याचा आरोप तपास अधिकारी असलेले सह पोलिस आयुक्त शंकर खटके यांनी फेटाळला.
नेमकं प्रकरण काय?
नाना पेठेत ५ सप्टेंबर रोजी झालेल्या आयुष कोमकर हत्याकांडात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत आतापर्यंत १२ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. अटकेत असलेल्या आरोपींमध्ये आंदेकर टोळीचा प्रमुख सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याच्यासह त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि थेट गोळीबार करणारे आरोपी यांचा समावेश आहे. पोलिसांनी ही कारवाई बुलढाणा आणि गुजरातमध्ये केली. गुन्हे शाखेने अटक केलेले शिवराज, शुभम, अभिषेक आणि लक्ष्मी आंदेकर यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. गुजरातमध्ये धडक कारवाई करून पकडलेल्या या चौघांना न्यायालयाने १८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या संपूर्ण हत्याकांडाचा सूत्रधार बंडू आंदेकरचा मुलगा आणि मयत माजी नगरसेवक वनराज आंदेकरचा भाऊ कृष्णा आंदेकर असल्याचे समोर आले आहे. त्याच्या सांगण्यावरूनच आयुषची हत्या करण्यात आल्याचा तपासात उलगडा झाला आहे. मात्र, पोलिसांच्या जाळ्यात सर्व आरोपी सापडले असले तरी कृष्णा आंदेकर फरार फरार होता तो आज पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे. कोर्टात हजर करण्यात आलेल्या सुनावणीदरम्यान बंडू आंदेकरने धक्कादायक दावा केला. “कृष्णाला पोलिसांसमोर हजर कर, नाहीतर त्याला गोळ्या घालू,” अशी धमकीच पोलिसांनी दिल्याचा आरोप त्याने केला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.