जैन मुनी म्हणतात, मुलींनी कटय़ार बाळगावी! कुर्ला येथील मारहाणीच्या घटनेचे पडसाद
कुर्ल्यातील पालिकेच्या उद्यानात अल्पवयीन टोळक्याने तरुण-तरुणीला केलेल्या बेदम मारहाणीचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. सुरक्षेसाठी मुली आणि महिलांनी आपल्याजवळ कटय़ार बाळगावी, असे आवाहन मुनी नीलेशचंद्र यांनी आज केले. आम्ही सकल हिंदू समाजाच्या घरोघरी तलवारी वाटणार आहोत, असेही ते म्हणाले.
कुर्ल्यातील घटनेनंतर सर्वच स्तरातून महिला, मुलींच्या सुरक्षेबाबत सवाल उपस्थित केले जात आहेत. मुंबईसाख्या शहरात भरदिवसा झालेल्या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणावर जैन मुनी नीलेशचंद्र यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
‘महाराष्ट्र हा शिवरायांचा आहे. टिपू सुलतानाचा नाही. आधी ‘माझगावच्या राजा’वर अंडी फेकण्यात आली. आता अवघ्या तेरा-चौदा वर्षांच्या मुलांनी तरुण-तरुणीवर हल्ला केला. हे हिंदूंवर आक्रमण करतात. मारहाण करतात. हे सहन न होण्यासारखे आहे. त्यामुळे हिंदू धर्मातील प्रत्येक आई-बहिणीला आम्ही तलवारींचे वाटप करणार आहोत’, असे नीलेशचंद्र म्हणाले.
असे आहे प्रकरण
कुर्ला पश्चिम येथील फिनिक्स मार्पेटसिटी मॉलजवळील पालिकेच्या स्वर्गीय प्रमोद महाजन उद्यानात 20 नोव्हेंबर रोजी 12 ते 15 वर्षांच्या अल्पवयीन्aा मुलांच्या टोळीने तरुण-तरुणीला हॉकीस्टिक आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करीत या मुलांना बाल न्याय मंडळासमोर हजर केले असता सहा हल्लेखोरांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
हे लहान हिरवे साप आहेत. साप लहान असो किंवा मोठा, तो विषारीच असतो. त्या नागाला वेळेतच ठेचणे गरजेचे असते. प्रत्येक मुलीने व महिलेने स्वतःजवळ कटय़ार बाळगावी! – नीलेशचंद्र, जैन मुनी
Comments are closed.