लातूर–कल्याण महामार्गाला विरोध, धाराशिवमध्ये सर्वपक्षीय नेते एकटवले, हायवेचा प्रस्तावित मार्ग ब
लातूर कल्याण जनकल्याण महामार्ग : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हिवाळी अधिवेशनात (Winter Session 2025) घोषित केलेल्या लातूर–कल्याण जनकल्याण द्रुतगती महामार्गावरून (Latur Kalyan Jan Kalyan Highway) आता बीड (Beed) आणि धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यांतील नेते आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रस्तावित महामार्गाचा मार्ग बदलून तो लातूर–कळंब मार्गे जावा, अशी जोरदार मागणी धाराशिव जिल्ह्यातून होत असून यासाठी सर्वपक्षीय नेते एकवटले आहेत.
सध्याचा प्रस्तावित महामार्ग लातूर–अंबाजोगाई–केज–बीड–जामखेड–अहिल्यानगर–कल्याण असा असून, धाराशिव जिल्ह्यातील नेत्यांनी यामध्ये बदल करून महामार्ग लातूर–कळंब–पारा–ईट–खर्डा–जामखेड–अहिल्यानगर–कल्याण मार्गे नेण्याची मागणी केली आहे. या बदलामुळे 60 ते 70 किलोमीटर अंतर कमी होणार असून सरकारच्या कोट्यवधी रुपयांची बचत होईल, असा दावा धाराशिवकरांकडून केला जात आहे.
Latur Kalyan Jan Kalyan Highway: धाराशिवमधून सर्वपक्षीय एकवटले
धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून महामार्गाचा मार्ग बदलण्याची मागणी केली आहे. माजी मंत्री तानाजी सावंत, माजी आमदार राहुल मोटे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी रस्ते विकास महामंडळाच्या संचालकांसोबत चर्चा करत महामार्ग कळंब मार्गे जावा अशी मागणी मांडली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडूनही महामार्ग कळंब मार्गेच असावा, अशी भूमिका मांडण्यात येत आहे. तर महामार्ग कळंब मार्गे जावा, यासाठी कळंब येथे महामार्ग संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली असून तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींनी यासंदर्भात अधिकृत ठराव मंजूर केले आहेत.
Latur Kalyan Jan Kalyan Highway: बीडमधील नेत्यांचा तीव्र विरोध
दुसरीकडे, बीड जिल्ह्यातील नेत्यांनी महामार्गाच्या मार्गात कोणताही बदल करू नये, अशी ठाम भूमिका घेतली आहे. खासदार बजरंग सोनवणे, माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार नमिता मुंदडा, आमदार प्रकाश सोळंके, तसेच खासदार रजनी पाटील यांनी महामार्गाचा मूळ प्रस्ताव कायम ठेवावा, अशी मागणी केली आहे.
Latur Kalyan Jan Kalyan Highway: राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता
एकीकडे धाराशिवमधील सर्वपक्षीय दबाव वाढत असताना, दुसरीकडे बीडमधील नेत्यांचा विरोध लक्षात घेता, लातूर–कल्याण जनकल्याण महामार्गावरून येत्या काळात बीड आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये राजकीय संघर्ष पेटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आता राज्य सरकार या वादावर कोणता निर्णय घेते, याकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.
Latur Kalyan Jan Kalyan Highway: नियोजित महामार्ग कसा आहे आणि मागणी काय?
नियोजित महामार्ग: लातूर – अंबाजोगाई – केज – बीड – जामखेड – अहिल्यानगर- कल्याण
धाराशिवकरांची मागणी : लातूर – कळंब – पारा – ईट – खर्डा – जामखेड- अहिल्यानगर – कल्याण
महामार्गात बदल केल्यास अंतर 60 ते 70 किलोमीटरने कमी होणार, तसेच कोट्यावधीचे बचत होणार
Latur Kalyan Jan Kalyan Highway: महामार्ग नकाशात बदलाची धाराशिवमधील या नेत्यांकडून मागणी
– प्रताप सरनाईक, शिवसेना पालकमंत्री धाराशिव
– तानाजी सावंत, आमदार शिवसेना
– राहुल मोटे, माजी आमदार राष्ट्रवादी
– कैलास पाटील, आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
– राणाजगजितसिंह पाटील, भाजप आमदार (कळंबमार्गे महामार्गाची मागणी, इतर नेत्यांप्रमाणे मागणी नाही.)
Latur Kalyan Jan Kalyan Highway: महामार्ग नकाशा बदलाला विरोध करणारे बीडचे नेते
– धनंजय मुंडे, राष्ट्रवादी परळी आमदार
– बजरंग सोनवणे, राष्ट्रवादी शरद पवार बीड खासदार
– नमिता मुंदडा, भाजप केज आमदार
– प्रकाश सोळंके, राष्ट्रवादी माजलगाव आमदार
– रजनी पाटील, काँग्रेस राज्यसभा खासदार
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.