रमेश म्हात्रेना पोलिसांची व्हीआयपी ट्रिटमेंट, ते सेलिब्रिटी आहेत काय? आम्हाला अरेरावी केली, धक्काबुक्कीही झाली.. वकिलांचा आरोप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला व पुरुष डॉक्टरांना शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले शंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे (७३) यांना शुक्रवारी जामीन अर्जावरील नावणीसाठी कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र यावेळी रमेश हात्रे यांना पोलिसांनी व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याचा आरोप वकिलांनी केला आहे. लिसांनी अरेरावी आणि धक्काबुक्की केली असा संतापही त्यांनी व्यक्त केला. शुक्रवारी दुपारी सुमारे ५० हून अधिक आल्याचा आरोप वकिलांनी केला.

पोलिसांचा ताफा न्यायालयात दाखल झाला. एखादा अतिमहत्त्वाचा व्यक्ती किंवा सेलिब्रिटी येणार असल्याप्रमाणे पोलिसांनी नायाधीशांचे दालन आणि न्यायालयासमोरील मार्गिका तातडीने रिकामी करण्यास सुरुवात कली. चला, येथून बाजूला व्हा, येथे एकही वकील दिसता कामा नये, अशा शब्दांत पोलिसांनी सूचना दिल्या. विरोध करणाऱ्या काही वकिलांना धक्काबुक्की करण्यात आली. तसेच बाजूला झाला नाहीत तर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करू, अशी धमकीही देण्यात आल्याचा आरोप वकिलांनी केला.

अॅड. रवींद्र अडसूळ यांनी पोलिसांच्या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी न्यायालयातील वकिलांकडे संशयित किंवा गोंधळ घालणाऱ्या व्यक्तींप्रमाणे पाहत न्यायालयाचा मार्ग मोकळा करण्यासाठी दमदाटी केली. हा संपूर्ण प्रकार न्यायाधीशांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तत्काळ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना पाचारण केले. न्यायालयीन परिसरात वकिलांशी अरेरावी किंवा धक्काबुक्की पुन्हा होऊ नये, अशी समज दिल्याचे अॅड. अडसूळ यांनी सांगितले.

आम्ही न्यायालयीन कामकाजासाठी न्यायालयात उपस्थित होतो. नगरसेवक अथवा कोणावरही गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला न्यायालयात आणले जात असेल तर तो आमच्या दृष्टीने आरोपीच असतो. त्याच्यासाठी न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण करून वकिलांना धक्काबुक्की करणे किंवा धमकावणे योग्य नाही.- अॅड. श्रद्धा जोशी, कल्याण कोर्ट.

Comments are closed.