ओबीसींना डावललं तर तुमचं अस्तित्व काळच ठरवेल; लक्ष्मण हाकेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
सोलापूर : मुख्यमंत्री साहेब, ज्यांनी तुमची आई-माई काढली, त्यांना तुम्ही मांडीवर घेऊन बसला आहात आणि त्यांच्या विरोधात हा लक्ष्मण हाके उभा राहिला होता. पण तुम्ही झुंडीला घाबरत आहात का? त्यांना घाबरून तुम्ही वाटेल ते बेकायदेशीर निर्णय घेत आहात, अशा अत्यंत जळजळीत शब्दांत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे. आजवर ज्यांनी ज्यांनी ओबीसी समाजाला डावललं, त्यांची अवस्था पवार कुटुंबासारखी झाली आहे, असा टोला त्यांनी लगावला.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं असून, लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला. मुख्यमंत्री साहेब, तुम्हीही ओबीसींना डावलले तर तुमचे भवितव्य आणि अस्तित्व काळच ठरवेल, अशा कडक शब्दांत हाके यांनी आपला संताप आणि नाराजी बोलून दाखवली आहे.
Maratha Vs OBC Reservation : क्लासचा निर्णय कास्टला कसा लागू होऊ शकतो?
आरक्षणाच्या सद्यस्थितीवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेवर बोट ठेवताना लक्ष्मण हाके यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. तुम्ही कितीही सारवासारव केली, तरी ओबीसींचे आरक्षण आता पूर्णपणे संपलं आहे. ज्या ओबीसी बांधवांनी तुम्हाला मोठ्या आशेने सत्तेत बसवलं, ते आम्ही आता केवळ पश्चाताप करत आहोत, अशी खंत हाके यांनी व्यक्त केली.
मनोज जरांगे पाटील यांच्या दबावाखाली येऊन सरकार जे निर्णय घेत आहे, ते पूर्णपणे बेकायदेशीर आहेत. कोर्टाचा किंवा क्लासचा निर्णय थेट कास्टला म्हणजे जातीला कसा लागू होऊ शकतो? जे हक्क ओबीसी समाजाचे आहेत, ते मराठा जातीला कसे दिले जाऊ शकतात, असा थेट सवाल त्यांनी केला.
गेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही उघडपणे महायुतीला मते मागितली आणि तुम्हाला सत्ता मिळवून दिली. मात्र, सत्तेत आल्यानंतर तुम्ही ओबीसींना वाऱ्यावर सोडून दिले, असा आरोप हाके यांनी केला.
Cockroach Janata Party : वेळ आल्यावर ‘कॉकरोच जनता पार्टी’सोबत चर्चा
राज्यात नव्यानेच उदयास आलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’बाबत बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, हा पक्ष नुकताच आला असून त्याचे काम सध्या प्रामुख्याने व्हर्च्युअल आहे. त्यांची आयडॉलॉजी आणि काम करण्याची पद्धत अजून पूर्णपणे समोर यायची आहे. सध्या राज्यातील तरुण वर्ग आणि नवी पिढी प्रचंड अस्वस्थ व संतप्त असून सत्ताधाऱ्यांनी या संतापाकडे दुर्लक्ष करणे महागात पडेल, असा इशारा त्यांनी दिला.
राज्यात सध्या विरोधी पक्षाची जागा रिकामी असून आमच्यासारखे चळवळीतील तरुण ती भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी ‘झेन झेड’ अर्थात कॉकरोच जनता पार्टीचे आगमन नक्कीच आशादायी आहे. त्यांची आरक्षणाबाबतची आणि भटके विमुक्त ओबीसींबाबतची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर आम्ही त्यांच्याशी नक्कीच चर्चा करू, असे हाके यांनी स्पष्ट केले.
Rohit Pawar Hunger Strike : रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन म्हणजे नौटंकी
आमदार रोहित पवार हे शेतकरी कर्जमाफीसाठी 12 जूनपासून पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू करणार आहेत. यावर कडाडून टीका करताना लक्ष्मण हाके यांनी, “सौ चूहे खाके बिल्ली चली हज को,” या म्हणीचा वापर करत रोहित पवारांची जोरदार खिल्ली उडवली.
ज्या पवार कुटुंबाने आणि त्यांच्या कंपन्यांनी वर्षानुवर्षे ऊस आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवली, त्याच पवारांचा नातू आता शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करतोय, हा एक मोठा जोक आहे, अशी सडकून टीका त्यांनी केली. पवार फॅमिलीला सत्तेशिवाय करमत नाही, असं सांगताना ‘घोडा घास से दोस्ती करेगा तो खायेगा क्या?’ असा टोला कत् रोहित पवारांचे हे आंदोलन म्हणजे केवळ एक राजकीय स्टंट आणि नौटंकी असल्याची घणाघाती टीका हाके यांनी केली.
ही बातमी वाचा:
अभिजीत दिपके झुरळ जनता पार्टी पीसी : आता मी एक नाही, लाखो तरुण माझ्यासोबत आहेत : अभिजीत दिपके
Comments are closed.