लक्ष्मण हाके-विजयसिंह पंडितांच्या समर्थकांचा गेवराईत राडा, 14 जणांवर गुन्हा दाखल, मनोज जरांगेंन
बीड: बीडच्या गेवराई शहरात दोन गटांमध्ये झालेल्या राडा प्रकरणाने खळबळ उडाली. या प्रकरणी लक्ष्मण हाके यांच्यासह तब्बल 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गटातील समर्थकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून गेवराई पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. गेवराई शहरात काल (सोमवारी) दोन गट आमने-सामने आले. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी पूर्वीच लक्ष्मण हाके यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावली होती. मात्र, त्यानंतरही हाके गेवराईत उपस्थित राहिल्याने दोन्ही गटातील वाद वाढला आणि वातावरण तणावपूर्ण बनले.
आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर गुन्हा दाखल
या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत लक्ष्मण हाके यांच्यासह 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दोन्ही गटातील समर्थकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत गोंधळ घातल्याने कायदा-सुव्यवस्था बिघडली होती. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही गटांवरही कारवाई केली आहे. दरम्यान, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. गेवराईतील या राडा प्रकरणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने शिस्त राखण्याचे आवाहन केले आहे. आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही.. कारण या घटने दरम्यान ते मुंबईमध्ये होते. गेवराई शहरामध्ये लक्ष्मण हाके आणि आमदार पंडित समर्थक हे आमने-सामने आले होते. आणि आता लक्ष्मण हाके यांच्यासह पंडित समर्थकांवर अशा एकूण 14 जणांवर हा गुन्हा दाखल आहे.
आमच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात, पण मनोज जरांगे हे…
याबाबत एबीपी माझाशी बोलताना लक्ष्मण हाके यांनी म्हटलं की, ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही दोन तीन वर्षे सनदशील मार्गाने उपोषण करून तत्व सांगून आरक्षण कसं महत्त्वाचं आहे, हे आरक्षण बेकायदा सुरू झालं तर आरक्षण कसं संपणार आहे, हे गेल्या दोन वर्षांपासून आम्ही राज्यात सांगतोय, आमचा पुतळा जाळला त्या परिसरातील कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आम्ही गेलो, त्यावेळी आमच्यावर दगडफेक केली जात असेल आणि आमच्यावरच गुन्हा दाखल होत असेल. आम्ही कायदा मानणारी लोक आहोत, आम्हाला जेलमध्ये टाका आमच्यावर लाठीचार्ज करा, प्रसंगी गोळ्या चालवा पण आम्ही ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ही लढाई लढणार, आम्हाला शासनाने प्रशासनाने गोळ्या घातल्या तरी चालतील, पण ओबीसींचं आरक्षण वाचवणार असल्याचं लक्ष्मण हाकेंनी म्हटलं आहे, आमच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात, पण मनोज जरांगे हे राज्याच्या संवैधानिक पदावर असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या आई-बहीण काढत असेल शिव्या देत असेल तर त्यांच्यालर कोणतं कलम लागणार की नाही, त्यांना कधी कोणती नोटीस जाणार की नाही, आम्हाला नोटीस देणार आणि एक माणूस सरकारला वेठीस धरून तिथली व्यवस्था तिथला कायदा व्यवस्था यांना चॅलेंज देणाऱ्या माणलाला तुम्ही एकदी नोटीस देत नाहीत, त्याबाबत कोणी बोलत नाही, तुम्ही त्यांना एकही नोटीस द्यायला तयार नाही, वेळोवेळी न्यायालयाच्या, कायद्याच्या, प्रशासनाच्या निर्णयाला चॅलेंज करणाऱ्या जरागेंना एकही नोटीस का नाही, असा सवालही हाकेंनी उपस्थित केला आहे.
https://www.youtube.com/watch?v=43CWHnswdtc
आणखी वाचा
Comments are closed.