24 तासातच LIC चा नवा विक्रम! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद, जाणून घ्या सविस्तर माहिती

एलआयसी धोरणः भारतीय जीवन विमा महामंडळ अर्थात एलआयसी ने मोठा विक्रम केला आहे. LIC ने गेल्या 24 तासात सर्वाधिक विमा पॉलिसी विकून आपल्या नावावर एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. एलआयसीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Records) बनवला आहे. LIC  च्या एकूण 452839 एजंट्सनी 20 जानेवारी रोजी संपूर्ण भारतात 5 लाख 88 हजार 107 जीवन विमा पॉलिसी विकून एक नवा विक्रम प्रस्थापित केला.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने केली पडताळणी

या ऐतिहासिक कामगिरीची पुष्टी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनेच केली आहे. यासोबतच 20 जानेवारी 2025 रोजी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने एलआयच्या नेटवर्कच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले आहे. 20 जानेवारी रोजी, देशभरातील एकूण 452839 एलआयसी एजंट्सनी 588107 जीवन विमा पॉलिसी विकून हा विक्रम साध्य केला आहे. एलआयसीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २४ तासाच्या आत, जीवन विमा उद्योगात एजंट उत्पादकतेसाठी एक नवीन जागतिक बेंचमार्क स्थापित झाला आहे.

एजंट्सच्या समर्पणाचे, कौशल्याचे आणि अथक परिश्रमामुळं गौरव

LIC ने जारी केलेल्या निवेदनात याबाबतची माहिती दिली आहे. हे आमच्या एजंट्सच्या समर्पणाचे, कौशल्याचे आणि अथक परिश्रमाच्या नीतिमत्तेचे एक शक्तिशाली प्रमाण असल्याची माहिती निवेदनात दिली आहे.  ही कामगिरी आमच्या ग्राहकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना महत्त्वाची आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याच्या आमच्या ध्येयाप्रती आमची खोल वचनबद्धता दर्शवते. हा विक्रमी प्रयत्न एलआयसीचे एमडी आणि सीईओ सिद्धार्थ मोहंती यांच्या पुढाकाराचे परिणाम आहे. ज्यामध्ये त्यांनी प्रत्येक एजंटला 20 जानेवारी 2025 रोजी ‘मॅड मिलियन डे’ रोजी किमान एक पॉलिसी पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. यावेळी बोलताना, मोहंती यांनी ‘मॅड मिलियन डे’ ऐतिहासिक बनवल्याबद्दल सर्व ग्राहक, एजंट आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

एलआयसी म्हणजे भारतीय जीवन विमा महामंडळ. जून 1956 मध्ये भारतीय जीवन विमा कायदा मंजूर झाल्यानंतर सप्टेंबर 1956 मध्ये तिने कॉर्पोरेट फर्म म्हणून आपले कामकाज सुरू केले. जुलै 1956 पासून एलआयसी कायदा लागू झाला. त्यामुळे भारतातील खाजगी विमा उद्योगाचे राष्ट्रीयीकरण होण्यास मदत झाली. 154 जीवन विमा कंपन्या, 16 परदेशी कंपन्या आणि 75 भविष्य निर्वाह कंपन्या यांचे विलीनीकरण करून एलआयसी ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. ही भारतातील सर्वात मोठ्या वित्तीय संस्थांपैकी एक आहे. एलआयसीचे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र येथे आहे.

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी! LIC चे डिजिटल परिवर्तनाच्या दिशेनं पहिलं पाऊल, पॉलिसीधारकांसाठी लाँच केला नवीन प्लॅटफॉर्म , काय होणार फायदे?

अधिक पाहा..

Comments are closed.