निवडणुकीआधीच भाजपच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड, कोणत्या विभागात किती नगरसेवक?


स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक भाजप बातम्या : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावारण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी काही उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. तर काही ठिकाणी जोरदार लढती रंगल्या आहेत. दरम्यान, भाजपने राज्यात निवडणुकीआधीच मोठी आघाडी घेतली आहे. कारण नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीत भाजपने शंभरीपार केली आहे. निवडणुकीआधीच भाजपच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे.

निवडणुकीआधीच भाजपच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड

नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीत निवडणुकीआधीच भाजपच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे. याबाबतची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामुळे बिनविरोध निवडीचा दावा त्यांनी केला आहे. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक ठिकाणी बिनविरोध निवड झाली आहे.

धुळ्यामधील दोंडाईचा नगरपरिषदेमध्ये 26 जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले

राज्यातील अनेक नगरपंचायती आणि नगरपरिषदांमध्ये भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्याचं चित्र आहे. धुळ्यामधील दोंडाईचा नगरपरिषदेमध्ये (दोंडाईचा नगर पंचायत) त्यापुढचे पाऊल पडले आहे. राज्याचे मंत्री जयकुमार रावल (जयकुमार रावल) यांच्या नेतृत्वाखाली या नगरपरिषदेमधील सर्व 26 जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. संपूर्ण बिनविरोध ठरणारी दोंडाईचा नगरपरिषद ही राज्यातील पहिलीच नगरपरिषद ठरली आहे. त्याचबरोबर सोलापूरजिल्ह्याती अनगर नगरपंचायत देखील बिनविरोध झाली आहे.

नेमकी कुठे काय परिस्थिती?

बिनविरोध जिंकलेले नगरसेवक – 100
बिनविरोध निवडून आलेले नगराध्यक्ष – 3

कुठल्या विभागात किती नगरसेवक बिनविरोध?

कोकण- 4
उत्तर महाराष्ट्र- ४९
पश्चिम महाराष्ट्र– ४१
मराठवाडा- 3
विदर्भ- 3

राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींची निवडणूक

राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या सर्व नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी 3 डिसेंबरला मतमोजनी होणार आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत यांचा प्रत्यक्ष कार्यक्रम जाहीर करत आहोत. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची सुरुवात ही 10 नोव्हेंबर 2025 पासून सुरु झाले होते. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत ही 17 नोव्हेंबर 2025 होती. नामनिर्देशन पत्राची 18 नोव्हेंबर 2025 ला छाननी झाली. अपील नसलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याची मुदत ही 21 नोव्हेंबर 2025 पर्यंत होती. अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माघार घेण्याची अंतिम मुदत 25 नोव्हेंबर 2025 आहे.

आणखी वाचा

Comments are closed.